नवी दिल्ली : आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वच्छ भारत मिशनसाठी आपल्या एक दिवसाचे वेतन दिले आहे.
इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असोसिएशन, इन्कम टॅक्स गॅजेटेड आॅफिसर्स असोसिएशन आणि इन्कम टॅक्स एम्प्लॉईज फेडरेशन या संघटनांच्या सदस्यांनी एकूण ५२,७५,१८३ रुपये या योजनेसाठी दिले. या संघटनांच्या प्रतिनिधींनी वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांना काल मदतीचा धनादेश सुपुर्द केला. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असोसिएशनचे महासचिव जयंत मिश्र यांनी सांगितले की, मोदी यांचे स्वच्छता अभियान आम्ही स्वीकारले आहे.
‘स्वच्छ भारत’ला आयकर विभागाचे ५२ लाख
आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वच्छ भारत मिशनसाठी आपल्या एक दिवसाचे वेतन दिले आहे
By admin | Updated: April 1, 2017 00:42 IST2017-04-01T00:42:22+5:302017-04-01T00:42:22+5:30
आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वच्छ भारत मिशनसाठी आपल्या एक दिवसाचे वेतन दिले आहे
