अमदनगर: जिल्हा परिषदेच्या दुष्काळ निवारणार्थ बोलविलेल्या सभेस अनुपस्थित प्रांताधिकार्यांसह तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकार्यांना मंगळवारी नोटिसा बजावल्या आहेत़ जिल्हा परिषद विरुध्द महसूल, असा वाद जिल्ह्यात प्रथमच निर्माण झाला आहे़ हा वाद जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे़ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुष्काळ निवारणार्थ सभा घेण्यात आली़ या सभेला महसूलच्या अधिकार्यांनी जातीने उपस्थित रहावे, अशा सूचना गुंड यांनी जिल्हा प्रशासनास केल्या होत्या़ त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्व प्रांत अधिकार्यांसह तहसीलदारांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश पंधरा दिवसांपूर्वीच दिले होते़ सभेची तारीखही संबंधित अधिकार्यांना कळविण्यात आली होती़ असे असले तरी जामखेड, श्रीगोंदा, पारनेर आणि पाथर्डी वगळता इतर तालुक्यांतील महसूलच्या अधिकार्यांनी सभेला दांडी मारलीच़ वेळोवेळी सूचना देऊन देखील महसूलचे अधिकारी हजर राहिले नाहीत़ हा जिल्हा परिषद प्रशासनाचा एकप्रकारे अपमान असल्याची सदस्यांची भावना झाली असून, संतप्त सदस्यांनी सभात्याग करत कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर धरणे धरले़ जिल्हा प्रशासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली़ दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कवडे यांनी संबंधित अधिकार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता संबंधित अधिकार्यांनी काम असल्याचे कारण दिले़ पूर्वी सूचना देऊनही अधिकारी उपस्थित न राहिल्याने अखेर जिल्हाधिकारी कवडे यांनी संबंधित अधिकार्यांना नोटिसा बजावल्या आहेत़ नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अध्यक्षा गुंड यांनी यापूर्वीच तक्रार केली होती़ तक्रार करूनही अधिकारी सभेला हजर राहिले नाहीत़ त्यामुळे सोमवारी होणारी सभा तहकूब करण्यात आली आहे़ जिल्ह्यात भीषण दुष्काळ निर्माण झालेला आहे़ दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनात समन्वय असणे अपेक्षित आहे़ परंतु, दोन्ही विभागात समन्वयाचा दुष्काळ असल्याने दुष्काळाचे निवारण कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे़ जिल्हा प्रशासन व महसूलच्या अधिकार्यांचा समन्वय करण्याचा कवडे यांनी प्रयत्न केला़ परंतु, तसे झाले नसल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली आहे़
सभेला अनुपस्थित महसूलच्या अधिकार्यांना नोटिसा जिल्हा परिषदेची सभा स्थगित: जिल्हाधिकार्यांची कारवाई
अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या दुष्काळ निवारणार्थ बोलविलेल्या सभेस अनुपस्थित प्रांताधिकार्यांसह तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकार्यांना मंगळवारी नोटिसा बजावल्या आहेत़ जिल्हा परिषद विरुध्द महसूल, असा वाद जिल्ात प्रथमच निर्माण झाला आहे़ हा वाद जिल्ात चर्चेचा विषय ठरला आहे़
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30
अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या दुष्काळ निवारणार्थ बोलविलेल्या सभेस अनुपस्थित प्रांताधिकार्यांसह तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकार्यांना मंगळवारी नोटिसा बजावल्या आहेत़ जिल्हा परिषद विरुध्द महसूल, असा वाद जिल्ात प्रथमच निर्माण झाला आहे़ हा वाद जिल्ात चर्चेचा विषय ठरला आहे़
