Lokmat Money > बिझनेस न्यूज > दाम-दुप्पट योजनेतील फरार संशयित शिर्डीत जेरबंद

दाम-दुप्पट योजनेतील फरार संशयित शिर्डीत जेरबंद

पाच जणांना अटक : औरंगाबाद, नाशिकमध्ये पाच कोटींचा गंडा

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30

पाच जणांना अटक : औरंगाबाद, नाशिकमध्ये पाच कोटींचा गंडा

Suspected Shirdar escaped from the price of Rs | दाम-दुप्पट योजनेतील फरार संशयित शिर्डीत जेरबंद

दाम-दुप्पट योजनेतील फरार संशयित शिर्डीत जेरबंद

च जणांना अटक : औरंगाबाद, नाशिकमध्ये पाच कोटींचा गंडा
शिर्डी : दामदुप्पट करून देतो, असे सांगून औरंगाबाद व नाशिक येथील नागरिकांना तब्बल पाच कोटींना गंडा घालून फरार झालेल्या संशयिताला पोलिसांनी शिर्डीत नाट्यमयरित्या अटक केली़ हा आरोपी शिर्डीत नाव बदलून कुटुंबासह रहात होता़
विजय प्रभाकर खोडगे (३५, रा़ औरंगाबाद) याने तीन वर्षांपूर्वी रक्कम दामदुप्पट करून देण्याच्या आमिषातून औरंगाबाद व नाशिक येथील नागरिकांना पाच कोटींना गंडा घातला होता़ या प्रकरणी नाशिकचे पोलीस विजयच्या मागावर होते़ विजय शिर्डीतील वेणुगोपाल रेड्डी या व्यक्तीच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वेणुगोपाल रेड्डी याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या वर्णनाची व्यक्ती बिरोबा रोडला फ्लॅट घेऊन राहात असून त्याचे आडनाव वाणी असल्याचे सांगितले़ त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा घातला असता विजय आपल्या पत्नी, आई, वडील, सासू, सासरे, बहीण व दोन मुलांसह राहात असल्याचे आढळून आले़ विजयच्या सासर्‍याने अटकपूर्व जामीन घेतलेला असल्याने त्यांना वगळता विजयसह त्याचे आई, वडील, पत्नी व बहिणीला अटक करून नाशिकला नेण्यात आले़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Suspected Shirdar escaped from the price of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.