Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वंकष दलित समाजाने एकत्र यावे सुशीलकुमार शिंदे : कैकाडी आणि भटक्यांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर

सर्वंकष दलित समाजाने एकत्र यावे सुशीलकुमार शिंदे : कैकाडी आणि भटक्यांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर

सोलापूर :

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:43+5:302014-08-31T22:51:43+5:30

सोलापूर :

Sushilkumar Shinde: On the way to fulfill the demands of the society | सर्वंकष दलित समाजाने एकत्र यावे सुशीलकुमार शिंदे : कैकाडी आणि भटक्यांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर

सर्वंकष दलित समाजाने एकत्र यावे सुशीलकुमार शिंदे : कैकाडी आणि भटक्यांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर

लापूर :
कैकाडी तसेच भटक्या समाजाचा एससी, एसटीमध्ये समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मी नुकतेच एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो, इतरही काही मागण्या लवकरच सुटतील, असे आश्वासन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल़े सर्व दलित समाजांनी एकत्र यावे, मी तुमच्याबरोबर आहे, संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळणार नाही, असेही शिंदे यांनी यावेळी आवाहन केल़े
टकारी समाजाच्या वतीने रविवारी सेंटलमेंट फ्री कॉलनी नंबर 1 येथे विमुक्त दिनानिमित्त झेंडा वंदन आणि सुशील मराठी विद्यालयात टकारी समाजाचा मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी शिंदे बोलत होत़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर भीमराव जाधव होत़े याप्रसंगी माजी महापौर विठ्ठल जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार,महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती वाघमारे, ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड, मनपाचे सभागृह नेते संजय हेमगड्डी, मागासवर्गीय आयोगाचे न्यायमूर्ती आऱएम़ बापट, नगरसेविका अश्विनी जाधव, गैबू जाधव, सचिन जाधव, सुरेश जाधव, चिंतामणी गायकवाड, अंबादास गायकवाड, र्शीदेवी फुलारे, सुशीला आबुटे, तुकाराम जाधव यांच्यासह समाजातील पदाधिकारी उपस्थित होत़े
शिंदे म्हणाले की, माझे सेंटलमेंट भागावर विशेष प्रेम आह़े सेंटलमेंट आणि राजीव गांधींचा जवळचा संबंध होता़ आपल्या काही मागण्या पूर्ण झाल्या, मात्र मागण्या संपल्या नाहीत, त्यासाठी पाठपुरावा सुरू आह़े संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही, वैयक्तिक, आर्थिक आणि सामाजिक संघर्षाशिवाय काही मिळत नाही़ त्यामुळे दलित समाजाने एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ मी अग्रेसिव्ह बोलत नाही, मात्र काम करुन दाखवितो़ मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पारधी, कैकाडी, भटके आदी समाजाला आर्थिक तरतूद करुन न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाल़े यावेळी शिंदे यांनी भीमराव जाधव, विठ्ठल जाधव, लक्ष्मण जाधव यांचे कौतुक केल़े
इंग्रजांनी काही जमातींना गुन्हेगार ठरविले मात्र पोटामुळे काही जण गुन्हेगारी कृत्ये करतात़ या भटक्यांच्या हाताला काम आणि त्यांच्या मुलांना शिक्षण दिल्यास निश्चित गुन्हेगारी कमी होईल, असे मत मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बापट यांनी व्यक्त केल़े
चौकट़़़
महाराष्ट्राने भटक्यांवर अन्याय केला
पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्राने भटक्यांवर खूप मोठा अन्याय केला़ मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना विमुक्त भटके मंत्रालय स्थापन करण्यात आले मात्र बजेटमध्ये 1 रुपयाचीदेखील तरतूद या मंत्रालयाला ठेवली जात नाही, हे दुर्दैव़ कर्नाटकात भटक्यांना सुविधा आहेत मात्र महाराष्ट्राने आमच्यावर अन्याय केला़ त्यामुळे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा तसेच पाडण्यासाठी आमचे उमेदवार उभे करण्याचा इशारा उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी दिला़ 52 वसाहती गुन्हेगारी म्हणविणार्‍या समाजांनी एकत्र यावे, असे ते म्हणाल़े
फोटो आह़े़़
मिलिंद राऊऴ़़
टकारी समाजाच्या वतीने विमुक्त दिनानिमित्त आयोजित केलेल्या जमातीच्या मेळाव्यात बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंद़े व्यासपीठावर न्यायमूर्ती बापट, माजी महापौर विठ्ठल जाधव, भीमराव जाधव, लक्ष्मण जाधव, ज्योती वाघमारे, अश्विनी जाधव, प्रकाश यलगुलवार आदी़

Web Title: Sushilkumar Shinde: On the way to fulfill the demands of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.