Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुरेंद्र नायडूला न्यायालयीन कोठडी

सुरेंद्र नायडूला न्यायालयीन कोठडी

एका महिलेशी दोघांचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून शिवसेनेचा जिल्हा सचिव सुरेंद्र पिरमल नायडू (४३) रा.पदमपूर याने गावातील शकील शेख (३४) या तरुणावर ...

By admin | Updated: December 23, 2015 02:14 IST2015-12-23T02:14:54+5:302015-12-23T02:14:54+5:30

एका महिलेशी दोघांचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून शिवसेनेचा जिल्हा सचिव सुरेंद्र पिरमल नायडू (४३) रा.पदमपूर याने गावातील शकील शेख (३४) या तरुणावर ...

Surendra Naidu's judicial custody | सुरेंद्र नायडूला न्यायालयीन कोठडी

सुरेंद्र नायडूला न्यायालयीन कोठडी

सोलापूर : साखरेचे दर घसरल्याने साखर उद्योग अडचणीत असल्याचे दिसत असतानाच केंद्र सरकारने ‘इथेनॉल’दर वाढवून दिल्याने ‘आसवनी’ प्रकल्पांबरोबरच साखर उद्योगाला चालना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या सकारात्मक निर्णयामुळे कारखानदारीला ‘ऊर्जितावस्था’ मिळाली आहे.
देशात व राज्यातील साखर उद्योगाला मागील वर्षापासून अडचणीचा काळ आहे. अडचणीच्या काळातही काही शेतकऱ्यांसमोर मात्र ‘ऊस’ पीक घेण्याशिवाय पर्याय नाही.
साखरेचे दर खाली आल्याने राज्यात व देशातच ‘ऊस’ अडचणीत असताना केंद्र सरकारच्या ‘इथेनॉल’बाबतच्या धोरणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही याच वर्षी केली आहे. याशिवाय लिटरमागे भरीव वाढही केली आहे.
यावर्षी ४० कोटी लिटरचे टेंडर
मागील वर्षी (२०१४-१५) आॅईल कंपन्यांनी राज्यातील इथेनॉल पुरवठादारांकडून टेंडर मागविले होते. ३५ इथेनॉल उत्पादकांनी टेंडरमध्ये भाग घेतला होता.
यंदा केंद्र शासनाने आॅईल कंपन्यांना राज्यासाठी इथेनॉल पुरवठाधारकांकडून ३९ कोटी ८१ लाख लिटरचे टेंडर काढले आहे. राज्यातील सहकारी, खासगी साखर कारखाने व खासगी अशा ४८ प्रकल्पांकडून २९ कोटी ३४ लाख लिटरचे टेंडर भरले आहे. उर्वरित ‘इथेनॉल’ मिळण्यासाठी फेरनिविदा काढण्यात आली
आहे.
केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये १० टक्के‘इथेनॉल’चे मिश्रण करण्याचा चांगला निर्णय घेतला. दरही चांगला दिल्याने आसवनी प्रकल्पांना चांगले दिवस आले आहेत. यातून साखर कारखानदारीला चांगला आधार मिळणार आहे.
-खा. विजयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष, इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आॅफ इंडिया

Web Title: Surendra Naidu's judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.