Lokmat Money > बिझनेस न्यूज > सन फार्मा- रॅनबॅक्सी: चौकशी कक्षेत वाढ

सन फार्मा- रॅनबॅक्सी: चौकशी कक्षेत वाढ

सन फार्मा आणि रॅनबॅक्सीच्या अब्जो डॉलरच्या सौद्याच्या चौकशीची भारतीय स्पर्धा आयोगाने व्याप्ती वाढवली आहे.

By admin | Updated: August 29, 2014 02:08 IST2014-08-29T02:08:23+5:302014-08-29T02:08:23+5:30

सन फार्मा आणि रॅनबॅक्सीच्या अब्जो डॉलरच्या सौद्याच्या चौकशीची भारतीय स्पर्धा आयोगाने व्याप्ती वाढवली आहे.

Sun Pharma - Ranbaxy: An increase in the inquiry cell | सन फार्मा- रॅनबॅक्सी: चौकशी कक्षेत वाढ

सन फार्मा- रॅनबॅक्सी: चौकशी कक्षेत वाढ

नवी दिल्ली : सन फार्मा आणि रॅनबॅक्सीच्या अब्जो डॉलरच्या सौद्याच्या चौकशीची भारतीय स्पर्धा आयोगाने व्याप्ती वाढवली आहे. दोन्ही औषधी कंपन्यांना प्रस्तावित विलीनीकरणाबाबतची विशिष्ट माहिती १० दिवसात सार्वजनिक करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
सन फार्मा आणि रॅनबॅक्सी यांच्या सौद्याची आयोगाने पहिल्यांदाच सार्वजनिक चौकशी सुरू केली आहे. स्पर्धा आयोगाद्वारे दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरणादरम्यान उचित व्यापार व्यवहार केला किंवा नाही याची चौकशी केली जात आहे.
सन फार्मा आणि रॅनबॅक्सी यांच्यात गेल्या एप्रिलमध्ये ४ अब्ज डॉलरचा विलीनीकरण सौदा झाला होता. या कंपन्यांना यासंदर्भात १० दिवसांत माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देश बुधवारी रात्री देण्यात आले आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Sun Pharma - Ranbaxy: An increase in the inquiry cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.