मुंबई : घरखर्चात काटकसर करणे अनेकांना चांगले जमते, त्यासाठीचे उपायही आपल्याजवळ असतात पण राज्याच्या खर्चात काटकसर करण्यासाठी उपाय सुचविल्यास तुम्हाला बक्षीस मिळू शकेल. अशी बक्षीस योजना वित्त व नियोजन विभाग लवकरच घेऊन येत आहे.
वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की सर्वोत्कृष्ट सूचना करणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. दुसऱ्या क्रमांकाच्या उत्कृष्ट सूचनेसाठी ७ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस असेल तर त्यानंतरच्या २५ उत्कृष्ट सूचनांसाठी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
सर्वोत्कृष्ट सूचनांची निवड ही नियोजन, वित्त आणि महसूल विभागाच्या सचिवांची एक समिती करेल. दरवर्षी ही बक्षिसे दिली जातील. महसुली खर्च कमी करणे, अनुत्पादक खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे, वित्तीय तूट कमी करणे, रोजगार निर्मिती करणे आणि राज्याचे उत्पन्न वाढविणे या बाबत सदर सूचना कराव्या लागतील. कोणत्याही व्यक्तीला या योजनेत सहभागी होता येईल. सूचना कशा करता येतील या बाबतची व्यवस्था लवकरच जाहीर केली जाईल, असे मुनगंटीवार म्हणाले. सर्वोत्कृष्ट सूचना शासन अमलात आणेल ज्याचा राज्याला निश्चितच फायदा होईल. सर्वोत्कृष्ट सूचना शासन अमलात आणेल ज्याचा राज्याला निश्चितच फायदा होईल. (विशेष प्रतिनिधी)
घोषणा अर्थसंकल्पातीलच
राज्याचा अर्थसंकल्प सादर करतानाच आपण वित्तीय व्यवस्थापनात जनतेला सहभागी करून घेण्यात येईल, अशी भूमिका मांडली होती. त्याचाच एक भाग म्हणून ही बक्षीस योजना असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करतानाच आपण वित्तीय व्यवस्थापनात जनतेला सहभागी करून घेण्यात येईल, अशी भूमिका मांडली होती. त्याचाच एक भाग म्हणून ही बक्षीस योजना असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
काटकसरीचे उपाय सूचवा; बक्षिसे जिंका
घरखर्चात काटकसर करणे अनेकांना चांगले जमते, त्यासाठीचे उपायही आपल्याजवळ असतात पण राज्याच्या खर्चात काटकसर करण्यासाठी उपाय सुचविल्यास तुम्हाला बक्षीस मिळू शकेल.
By admin | Updated: July 29, 2015 02:52 IST2015-07-29T02:52:50+5:302015-07-29T02:52:50+5:30
घरखर्चात काटकसर करणे अनेकांना चांगले जमते, त्यासाठीचे उपायही आपल्याजवळ असतात पण राज्याच्या खर्चात काटकसर करण्यासाठी उपाय सुचविल्यास तुम्हाला बक्षीस मिळू शकेल.
