पणे : राज्यातील १५७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले असून, ११९.८३ लाख टन ऊस गाळपातून आतापर्यंत ११२.२६ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उताराही ९.३७ टक्क्यांवर पोचला आहे. राज्यातील ९७ सहकारी व साठ खासगी कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. पुणे विभागातील ५३ कारखान्यांतून ५६.३९ लाख टन ऊसाचे गाळप झाले असून, सरासरी ९.७७ टक्के साखर उतार्याने ५५.०७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. कोल्हापुरातील ३० कारखान्यांतून १९.४० लाख टन ऊस गाळपातून १९.१९ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली असून, सरासरी ९.८९ टक्के साखर उतारा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील २५ कारखान्यांतून १७.४१ लाख टन ऊस गाळपातून सरासरी ८.८६ टक्के साखर उतार्याने १५.४२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर नांदेड विभागातील २७ कारखान्यांत १५.२५ लाख टन ऊस गाळपातून, १३.६० लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. तर ८.९२ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ११४ साखर कारखान्यांतून ५८.८६ लाख टन ऊसाचे गाळप झाले होते. तर सरासरी ८.८० टक्के साखर उतार्यातून ५१.८० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते, अशी माहिती साखर सह संचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी दिली. ---
राज्यातील साखर उत्पादन ११२ लाख क्विंटलवर
पुणे : राज्यातील १५७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले असून, ११९.८३ लाख टन ऊस गाळपातून आतापर्यंत ११२.२६ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उताराही ९.३७ टक्क्यांवर पोचला आहे.
By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:54+5:302014-12-02T00:35:54+5:30
पुणे : राज्यातील १५७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले असून, ११९.८३ लाख टन ऊस गाळपातून आतापर्यंत ११२.२६ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उताराही ९.३७ टक्क्यांवर पोचला आहे.
