पणे : राज्यातील ११९ सहकारी व खासगी साखर कारखान्यांतून बुधवार अखेर ५७.९६ लाख टन ऊस गाळपातून ५०.८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा ८.७८ टक्के इतका मिळाला आहे. कोल्हापुर विभागातील १९ साखर कारखान्यांतून ५.८९ लाख टन ऊस गाळपातून ४.७२ लाख क्विंटल, पुणे विभागातील ४५ कारखान्यांत ३१.९४ लाख टन ऊस गाळपातून ३०.३२ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. नगरमधील १८ कारखान्यांतून ७.९४ लाख टन ऊस गाळपातून ६.७५ लाख क्विंटल, औंरगाबादेत ४.५२ लाख टनातून ३.०५ लाख क्विंटल, नांदेडमध्ये ७.४६ लाख टनातून ५.९५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. पुणे विभागाने सरासरी ९.४९ टक्के साखर उतारा घेत आघाडी मिळविली असून, पाठोपाठ नगरचा साखर उतारा साडेआठ टक्के इतका आहे. तर साखर उतार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या कोल्हापुर जिल्ह्यात मात्र आत्तापर्यंत केवळ ८.०२ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे.
साखरेचे उत्पादन ५० लाख क्विंटलवर
पुणे : राज्यातील ११९ सहकारी व खासगी साखर कारखान्यांतून बुधवार अखेर ५७.९६ लाख टन ऊस गाळपातून ५०.८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा ८.७८ टक्के इतका मिळाला आहे.
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:20+5:302014-11-21T22:38:20+5:30
पुणे : राज्यातील ११९ सहकारी व खासगी साखर कारखान्यांतून बुधवार अखेर ५७.९६ लाख टन ऊस गाळपातून ५०.८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा ८.७८ टक्के इतका मिळाला आहे.
