- सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सध्या टी-२0 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा चालू आहे. त्यात भारत-बांगलादेश मॅचमधील धोनीच्या स्टम्पिंगची चर्चा सर्वदूर आहे. आर्थिक वर्षाचा शेवट म्हणजेच मार्च एंड येऊन ठेपला आहे. या अनुषंगे करदात्याने मार्च एंड होण्याआधीच दक्षता घ्यावी ज्याने त्याचे स्टम्पिंग होणार नाही.
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, खरोखरच भारत-बांगलादेशचा सामना खूप रोमांचक व चुरशीचा होता; तसेच धोनीची शेवटच्या क्षणीची समयसूचकता वाखाणण्याजोगी होती. याला अनुसरून क्रिजची लाईन म्हणजे ३१ मार्च तारखेची डेडलाईन, बॅटिंग करणारा खेळाडू म्हणजेच करदाता, स्टम्पिंग करणारा कर अधिकारी व फिल्डिंग करणारे हे विविध करदात्याचे अधिकारी. जसे क्रिकेटमध्ये वेळेवर क्रिजमध्ये पोहोचले नाही, तर स्टम्पिंग होते; तसेच करदात्याने ३१ मार्चची डेडलाईन पाळली नाही, तर त्याचे स्टम्पिंग होऊ शकते. म्हणजेच वेळेवर कर भरला नाही, तर विविध कायद्यांच्या अनुषंगाने व्याज, दंड, लेट फी इ. भरावी लागू शकते.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने ३१ मार्चपूर्वी आयकराची कोणती कामे करावीत ज्यामुळे त्याची स्टम्पिंग होणार नाही?
कृष्ण : अर्जुना, करदात्याने स्टम्पिंग होऊ नये म्हणून पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात-
१) कलम ८0 मध्ये पी.एफ., विमा इ. वजावट घ्यावयाची असेल तर ३१ मार्चपूर्वीच गुंतवणूक करावी.
२) पगारदार व्यक्तींनी गुंतवणुकीची व वजावटीची माहिती एम्प्लॉयरला द्यावी ज्यामुळे मार्च महिन्याची करकपात कमी होईल.
३) जर अॅडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता १५ मार्चपूर्वी भरला नसेल तर त्यांनी तो ३१ मार्चपूर्वी भरावा. त्यामुळे व्याज कमी लागेल.
४) मार्च २0१४ चे आयकर रिटर्न दाखल केले नसेल तर ते ३१ मार्च २0१६ पर्यंत दाखल करता येईल.
५) जर २६ ए एस व आयकर रिटर्नमधील उत्पन्न यात तफावत असल्यास एन्क्वायरी येऊ शकते.
६) व्यापारात उलाढाल १ कोटीच्या वर असेल तर टॅक्स आॅडिट करून घ्यावे.
७) करदात्याने व्याजाचे देणे-घेणे व त्यावरील टीडीएसचा हिशोब ठेवावा.
८) एका दिवशी एका व्यक्तीने रु. २0 हजारच्या वर रोखीने खर्च करू नये.
९) टॅक्स आॅडिट लागू असणाऱ्या वैयक्तिक करदात्यांना विशिष्ट व्यवहारावर टीडीएस करावा लागतो.
१0) आयकरातील सर्व माहिती ६६६.्रल्लूङ्मेी३ं७्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर मिळते.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने ३१ मार्चपूर्वी व्हॅट, प्रोफेशन टॅक्सची कोणती कामे करावीत ज्यामुळे त्याची स्टम्पिंग होणार नाही?
कृष्ण : अर्जुना, करदात्याने स्टम्पिंग होऊ नये म्हणून पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात-
१) व्हॅट व प्रोफेशन टॅक्समधील सर्व माहिती ६६६.ेंँं५ं३.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर मिळते.
२) व्हॅट कायद्यांतर्गत आता एप्रिलच्या रिटर्नमध्ये बिलानुसार खरेदी व विक्रीची माहिती द्यावी लागणार आहे. त्याची पूर्वतयारी करावी लागेल.
३) जर उलाढाल १0 लाख रुपयांच्या वर असेल तर व्हॅट रजिस्ट्रेशन कम्पलसरी आहे.
४) डीलर इम्फॉर्मेशन सिस्टीममध्ये दिलेली माहिती जसे मिसमॅच रिपोर्ट, रिटर्न दाखल केल्याची माहिती, कर भरल्याची माहिती तपासावी.
५) व्यापाराची उलाढाल १ कोटीच्या वर असेल तर व्हॅट आॅडिट अनिवार्य.
६) व्हॅटचा सेट आॅफ रु. ५ लाखांच्या वर असेल तर पुढील वर्षात कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही.
७) ज्या करदात्याने त्याच्या पगारी ठेवलेल्या व्यक्तीचा प्रोफेशन टॅक्स कपात केला असेल व वार्षिक कर रु. ५0 हजारपेक्षा कमी असेल तर त्याला मार्च ते फेब्रुवारी या कालावधीचा प्रोफेशन टॅक्स व त्याचे रिटर्न ३१ मार्चपूर्वी दाखल करणे.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने ३१ मार्चपूर्वी सेवाकराची कोणती कामे करावीत ज्यामुळे त्याची स्टम्पिंग होणार नाही?
कृष्ण : अर्जुना, करदात्याने स्टम्पिंग होऊ नये म्हणून पुढील गोष्टी कराव्यात-
१) १0 लाखांपेक्षा जास्त सर्व्हिसेस दिल्या तर सर्व्हिस टॅक्स लागू होतो.
२) कंपनी करदात्याने मार्च महिन्याचा किंवा इतर करदात्यांनी जानेवारी ते मार्च या तिमाहीचा सेवाकर भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.
३) सेवाकरदात्याने या कालावधीमध्ये दिलेली सेवा, त्याची बिले इ.ची जुळवाजुळव करून हिशोब करावा व ३१ मार्चआधी सेवाकर भरावा.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने ३१ मार्चपूर्वी कोणती कामे करावीत ज्यामुळे त्याची स्टम्पिंग होणार नाही?
कृष्ण : अर्जुना, स्टम्पिंग होऊ नये म्हणून पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात-
१) क्लोजिंग स्टॉक- आर्थिक विश्वात नफा-तोटा पत्रकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नफा-तोटा पत्रकाचा क्लोजिंग स्टॉक हा पाया आहे.
२) करदात्याने देणारे व घेणारे यांचे रिकन्सिलिएशन करावे. करदाता ज्या व्यापाऱ्यासोबत व्यापार करतो त्याच्याकडून त्याच्या पुस्तकातील आपला अकाऊंट घेणे व त्याचा मेळ आपल्या पुस्तकासोबत करावा.
३) बँक व लोन रिकन्सिलिएशन- करदात्याने सर्व बँकेचे व लोन खात्याचे मार्चअखेर रिकन्सिलिएशन करणे खूप महत्त्वाचे आहे.
४) करदात्याने व्यापाराची प्रोजेक्टेड व कम्पॅरिटिव्ह बॅलेन्सशीट व प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट तयार करावे ज्यामुळे करदात्याला मागील वर्षात झालेली उलाढाल, नफा-तोटा खर्च इ. समजेल.
अर्जुन : कृष्णा, मार्च एंडिंगची कामे पेंडिंग नाहीतर होईल स्टम्पिंग यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, वर्षभर मेहनत करून पैसा कमविण्यात वा देणी-घेणी, कर्ज फेडण्यात करदाता धावपळ करीत असतो. घराची आणि व्यापाराची खेळी खेळत असतो. या धावपळीत ‘कर’विषयी कामे पेंडिंग पडतात व ती वेळेत पूर्ण न केल्याने करदात्याची स्टम्पिंगची वेळ येते. त्यामुळे वर्षाच्या शेवटी खूप मेहनत करून कमविले; परंतु वेळेवर कर न भरल्यामुळे गमविले. जसे बांगलादेशाचे झाले तसे करदात्याचे होऊ नये म्हणून वेळेवर क्रिजमध्ये पोहोचावे याचा अर्थ कायद्याचे पालन करावे.
स्टम्पिंग-जर मार्च एंडिंगची कामे राहतील पेंडिंग
कृष्णा, सध्या टी-२0 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा चालू आहे. त्यात भारत-बांगलादेश मॅचमधील धोनीच्या स्टम्पिंगची चर्चा सर्वदूर आहे. आर्थिक वर्षाचा शेवट म्हणजेच मार्च एंड
By admin | Updated: March 28, 2016 01:49 IST2016-03-28T01:49:59+5:302016-03-28T01:49:59+5:30
कृष्णा, सध्या टी-२0 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा चालू आहे. त्यात भारत-बांगलादेश मॅचमधील धोनीच्या स्टम्पिंगची चर्चा सर्वदूर आहे. आर्थिक वर्षाचा शेवट म्हणजेच मार्च एंड
