Lokmat Money > बिझनेस न्यूज > ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगली पाहिजे

ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगली पाहिजे

* रामनाथ सोनावणे यांचे मत

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:25+5:302014-08-25T21:40:25+5:30

* रामनाथ सोनावणे यांचे मत

Students should be upbeat about their knowledge | ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगली पाहिजे

ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगली पाहिजे

*
ामनाथ सोनावणे यांचे मत
कल्याण - मानवी कल्पनाशक्तीपलीकडे जे ज्ञान आहे, ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी लालसा, जिद्द बाळगून भरपूर वाचन, निरीक्षण केले पाहिजे, असे केडीएमसीचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी रविवारी सांगितले.
राष्ट्र सेवा दल कल्याण-डोंबिवली विभागातर्फे आयोजित एकलव्य सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री विनय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास अभिनेता अभिजित झुंजारराव, आपले द्या संस्थेचे अध्यक्ष माधव गुरव, पत्रकार किरण सोनावणे, ॲड़ नियाज मोमीन, भिकू बारस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर राष्ट्र सेवा दल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांत स्वत: मिळेल ते काम करून शिक्षण घेणारे, कचरा गोळा करून शिक्षण घेणारे तसेच रेल्वे फलाटांवर भटकणारे, लहान-मोठे व्यवसाय करून अभ्यास करून दहावी उत्तीर्ण झालेल्या विविध स्तरांतील विद्यार्थ्यांना या वेळी एकलव्य पुरस्कार, पुढील शिक्षणासाठी रोख साहाय्य देऊन सोनावणे व अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
(वार्ताहर / विनायक बेटावदकर)

Web Title: Students should be upbeat about their knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.