मुंबई : प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळावा, यासाठी परवडणा:या घरांच्या निर्मितीची चर्चा आता सरकारी पातळीवरूनही सुरी झाली असतानाच आता भारतीय रिझव्र्ह बँकेने पुढाकार घेत या संदर्भात धोरणात्मक भूमिका जाहीर करण्याचे संकेत दिले.
रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, बांधकाम उद्योगाला चालना मिळण्यासोबतच परडवणा:या किमतीतील घरांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी बांधकाम उद्योग आणि अनुषंगिक बँकिंग व्यवस्था यासंदर्भात धोरणात्मक भूमिका जाहीर करण्यात येईल.
गरज भासल्यास पॉलीसीमध्येही काही बदल आवश्यक असल्यास ते केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)