मुंबई : गुरुवारी घसरण झाल्यानंतर शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात तेजीचे पुनरागमन झाले. दिवसभर चढ-उतार होऊन सेन्सेक्स ९५ अंकांनी वधारून २४,७१७.९९ अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारात असलेले सकारात्मक वातावरण आणि दैनंदिन उपयोगात येणारे सामान बनविणाऱ्या कंपन्या, आरोग्य आणि तेल कंपन्यांच्या शेअर्सना चांगली मागणी असल्याने बाजारात तेजी आली.
या संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स ०.२९ टक्क्यांनी, तर निफ्टी ०.३३ टक्क्यांनी मजबूत झाला. निफ्टी ७,५०० अंकांपेक्षा वर जाऊन ७,७१०.२० वर बंद झाला.
राज्यसभेत भूसंपदा विधेयक संमत झाल्याने रिअल ईस्टेटविषयक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
शेअर बाजारात तेजी परतली
गुरुवारी घसरण झाल्यानंतर शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात तेजीचे पुनरागमन झाले. दिवसभर चढ-उतार होऊन सेन्सेक्स ९५ अंकांनी वधारून २४,७१७.९९ अंकांवर बंद झाला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 03:35 IST2016-03-12T03:35:39+5:302016-03-12T03:35:39+5:30
गुरुवारी घसरण झाल्यानंतर शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात तेजीचे पुनरागमन झाले. दिवसभर चढ-उतार होऊन सेन्सेक्स ९५ अंकांनी वधारून २४,७१७.९९ अंकांवर बंद झाला.