Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात तेजीचे बार

शेअर बाजारात तेजीचे बार

मुंबईच्या दलाल पथावर दिवाळीपूर्वीच तेजीचे फटाके फुटले. विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या बाजूने मिळालेला जनतेचा कौल व इंधन सुधारणा यामुळे उत्साहित मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ३२१ अंकांनी झेपावला.

By admin | Updated: October 21, 2014 05:00 IST2014-10-21T05:00:35+5:302014-10-21T05:00:35+5:30

मुंबईच्या दलाल पथावर दिवाळीपूर्वीच तेजीचे फटाके फुटले. विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या बाजूने मिळालेला जनतेचा कौल व इंधन सुधारणा यामुळे उत्साहित मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ३२१ अंकांनी झेपावला.

Stock markets fast times | शेअर बाजारात तेजीचे बार

शेअर बाजारात तेजीचे बार

मुंबई : मुंबईच्या दलाल पथावर दिवाळीपूर्वीच तेजीचे फटाके फुटले. विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या बाजूने मिळालेला जनतेचा कौल व इंधन सुधारणा यामुळे उत्साहित मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ३२१ अंकांनी झेपावला.
वाहन, भांडवली वस्तू, बँकिंग, तेल शुद्धीकरण व ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची मोठी मागणी राहिली. सेन्सेक्सवरील एकूण १,६०० शेअर्सला तेजीचा लाभ झाला. बीएसईच्या १२ पैकी १० श्रेणींचे निर्देशांक तेजीसह बंद झाले, तर आयटी व तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्देशांकात घसरण नोंदली गेली आहे.
दुसरीकडे विदेशी बाजारातही तेजीचा कल होता. याचाही स्थानिक बाजार धारणेवर सकारात्मक परिणाम झाला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाही मजबूत होऊन ६१.३० प्रतिडॉलरच्या पातळीवर पोहोचला. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ३२१.३२ अंक वा १.२३ टक्क्यांच्या घसरणीसह २६,४२९.८५ अंकांवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्स २६,३६८.९४ ते २६,५१७.९० अंकांदरम्यान राहिला. शुक्रवारी सेन्सेक्स १०९.१९ अंकांनी बळकट झाला होता. नऊ आॅक्टोबरनंतरची ही सर्वांत मोठी तेजी आहे. त्यादिवशी सेन्सेक्स ३९०.४९ अंकांनी उंचावला होता.
तिकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकावेळी ७,९०० अंकांची पातळी ओलांडत ७,९०५.५० अंकांवर पोहोचला. अखेरीस ९९.७० अंक वा १.२८ टक्क्यांच्या तेजीसह निफ्टी ७,८७९.४० अंकांवर बंद झाला.
सरकारने डिझेलचे दर बाजाराधिष्ठित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीपीसीएल, एचपीसीएल व इंडियन आॅईल या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या समभागांत सोमवारी ७.३८ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदली गेली आहे. तथापि, याउलट रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर ०.३९ टक्क्यांनी घटले. ओएनजीसी व गेल यांचे शेअर्सही ५.४४ टक्क्यांनी तेजीत राहिले. टाटा मोटर्स, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा व मारुती सुझुकी यांच्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली.
ओएनजीसीचे समभाग ५.४४ टक्क्यांनी झेपावले. हिंदाल्कोत ४.६९ टक्के, टाटा मोटर्समध्ये ३.९४ टक्के, अ‍ॅक्सिस बँक ३.९२ टक्के, एल अ‍ॅण्ड टी २.९० टक्के, कोल इंडिया २.६० टक्के, गेल इंडिया २.४१ टक्के व मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये २.१७ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. एचडीएफसी, सेसा स्टरलाईट, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकार्प, एसबीआय, एनटीपीसी, टाटा पॉवर व डॉ. रेड्डीज यांनाही लाभ झाला. दुसरीकडे विप्रोच्या शेअर्समध्ये १.७६ टक्क्यांची घट नोंदली गेली. इन्फोसिसमध्ये १.०९ टक्के व टीसीएसमध्ये ०.८८ टक्के घट झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Stock markets fast times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.