Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार सावरला

शेअर बाजार सावरला

भारतासह जागतिक बाजारात घसरणीस कारणीभूत ठरलेल्या चीनने मंगळवारी व्याजदरात कपात करीत बाजारात अधिक भांडवल उपलब्धी केल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातील बाजार किंचित सुधारला.

By admin | Updated: August 26, 2015 05:14 IST2015-08-26T05:14:29+5:302015-08-26T05:14:29+5:30

भारतासह जागतिक बाजारात घसरणीस कारणीभूत ठरलेल्या चीनने मंगळवारी व्याजदरात कपात करीत बाजारात अधिक भांडवल उपलब्धी केल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातील बाजार किंचित सुधारला.

Stock Market Savings | शेअर बाजार सावरला

शेअर बाजार सावरला

मुंबई : भारतासह जागतिक बाजारात घसरणीस कारणीभूत ठरलेल्या चीनने मंगळवारी व्याजदरात कपात करीत बाजारात अधिक भांडवल उपलब्धी केल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातील बाजार किंचित सुधारला. शेअर बाजारात तेजीची झुळूक अनुभवण्यास मिळाली असली तरी रुपयाची घसरण मात्र सुरूच आहे. सोमवारच्या तुलनेत रुपयात ५६ पैशांची घसरण झाली.
चीन अर्थव्यवस्थेत मंदीचा शिरकाव झाल्यानंतर त्याचा पाश अधिक घट्ट विणला जाऊ नये, याकरिता पायबंद घालण्याच्या दृष्टीने गेल्या आठवड्यात युआनचे २ टक्के अवमूल्यन करण्यात आले. त्यापाठोपाठ मंगळवारी ‘द पीपल्स बँक आॅफ चायना’ (पीबीओसी) तेथील रेपो दरात पाव टक्के कपातीची घोषणा केली आहे. यामुळे चिनी अर्थव्यवस्थेत ६५० अब्ज युआन उपलब्ध होणार आहे. मंदीचा निपटारा करण्यासाठी सज्ज असल्याचे भक्कम संकेत चीनने या माध्यमातून दिल्याने चीनसह जगभरातील भांडवली बाजारात तेजीची झुळूक निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Stock Market Savings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.