Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार पुन्हा उसळला; सेन्सेक्स ४0२ अंकांवर

शेअर बाजार पुन्हा उसळला; सेन्सेक्स ४0२ अंकांवर

सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0२ अंकांनी उसळून २७,५0७.३0 अंकांवर बंद झाला.

By admin | Updated: May 12, 2015 00:10 IST2015-05-12T00:10:26+5:302015-05-12T00:10:26+5:30

सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0२ अंकांनी उसळून २७,५0७.३0 अंकांवर बंद झाला.

Stock market recovers; Sensex at 402 points | शेअर बाजार पुन्हा उसळला; सेन्सेक्स ४0२ अंकांवर

शेअर बाजार पुन्हा उसळला; सेन्सेक्स ४0२ अंकांवर

मुंबई : सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0२ अंकांनी उसळून २७,५0७.३0 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३३.७५ अंकांनी उसळून ८,३२५.२५ अंकांवर बंद झाला.
कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा जास्त चांगले राहिल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून दर कपात केली जाण्याची शक्यता वाढली आहे. त्याचा सुपरिणाम बाजारांवर झाला आहे.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स सकाळी सकारात्मक नोंदीसह उघडला. एका क्षणी त्याने २७,५४४.२४ अंकांपर्यंत उसळी घेतली होती. सत्र अखेरीस ४0१.९१ अंक म्हणजेच १.४८ टक्के वाढ नोंदवून तो २७,५0७.३0 अंकांवर बंद झाला. २३ एप्रिलनंतरचा हा उच्चांक ठरला आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २७,७३५.0२ अंकांवर बंद झाला होता.
सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २६ कंपन्यांचे समभाग तेजीने बंद झाले. शुक्रवारी सेन्सेक्स ५0६.२८ अंकांनी वाढला होता. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मॅट कराचा मुद्दा उच्चस्तरीय समितीकडे सोपविल्यामुळे बाजारात विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील सीएनएक्स निफ्टी पुन्हा एकदा ८,३00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. १३३.७५ अंक अथवा १.६३ टक्के वाढीसह ८,३२५.२५ अंकांवर तो बंद झाला.
मेटल, आॅटो, बँकिंग, टिकाऊ, आरोग्य, आयटी, तेल आणि गॅस, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वाढले.
आजची तेजी व्यापक होती. स्मॉलकॅप आणि मीडकॅप अनुक्रमे १.२८ टक्के आणि २.५३ टक्के वाढला. बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,७६0 कंपन्यांचे समभाग वाढले.
९६९ कंपन्यांचे समभाग घटले. १0२ कंपन्यांचे समभाग उतरले. बाजाराची एकूण उलाढाल मात्र घसरून २,७१८.७२ कोटी झाली. शुक्रवारी ती २,९६0.२८ कोटी होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Stock market recovers; Sensex at 402 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.