मुंबई : महागाईचा टक्का वाढल्यामुळे व्याजदर कपातीवर कुऱ्हाड येण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात शुक्रवारी मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४२७ अंकांनी कोसळून २८,५0३.३0 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२८ अंकांनी कोसळून ८,६४७.७५ अंकांवर बंद झाला.
फेब्रुवारी महिन्यातील किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ५.३७ अंकांवर पोहोचला आहे. त्यामुळे बाजारात निराशा पसरली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २९,१३४.९३ अंकांवर उघडला. नंतर तो २९,१८३.७६ आणि २८,४४८.४८ अंकांच्या मध्ये हलताना दिसून आला. सत्र अखेरीस तो २८,५0३.३0 अंकांवर बंद झाला. ४२७.११ अंकांची अथवा १.४८ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. या सप्ताहात सेन्सेक्स ९४५.६५ अंकांनी अथवा ३.२१ टक्क्यांनी घसरला आहे. सेन्सेक्समधील ३0 पैकी २७ कंपन्यांचे समभाग घसरले. भारती एअरटेल, ओएनजीसी आणि एनटीपीसी या तीनच कंपन्यांचे समभाग वाढले. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी १२८.२५ अंकांनी अथवा १.४६ टक्क्यांनी घसरून ८,६४७.७५ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो ८,८४९.७५ अंकांपर्यंत वर उसळला होता. तर ८,६३१.७५ अंकांपर्यंत खालीही गेला होता.
आशियाई बाजारात मात्र वाढीचा कल दिसून आला. चीन, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियाचे बाजार 0११ टक्के ते १.३९ टक्के वर चढले. सिंगापूर आणि तैवान येथील बाजार घसरले. युरोपमध्ये सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली. किरकोळ विक्री क्षेत्रातील आकडेवारी निरुत्साही असल्यामुळे फेडरल रिझर्व्हचा व्याजदरवाढीचा निर्णय लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने युरोपीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
शेअर बाजाराची पुन्हा आपटी
महागाईचा टक्का वाढल्यामुळे व्याजदर कपातीवर कुऱ्हाड येण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात शुक्रवारी मोठी पडझड झाली.
By admin | Updated: March 13, 2015 23:58 IST2015-03-13T23:58:04+5:302015-03-13T23:58:04+5:30
महागाईचा टक्का वाढल्यामुळे व्याजदर कपातीवर कुऱ्हाड येण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात शुक्रवारी मोठी पडझड झाली.
