मुंबई : शेअर बाजारात सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२६.८९ अंकांनी वाढून १ आठवड्याच्या उंचीवर पोहोचला. भांडवली वस्तू, एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रात खरेदी वाढल्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३८.५0 अंकांनी वाढून वर चढला.
सोमवारच्या तेजीनंतर एनएसई निफ्टीने पुन्हा एकदा ८,३00 अंकांची पातळी गाठली. 0.४६ टक्क्यांची वाढ नोंदवून निफ्टी ८,३२३ अंकांवर बंद झाला. खरे म्हणजे निफ्टी संपूर्ण दिवसभर घसरणीला लागलेला होता. शेवटच्या दीड तासात अचानक खरेदी वाढली आणि निर्देशांक वर चढला.
बीएसई सेन्सेक्स सकाळी २७,५२३.८६ अंकांवर तेजीसह उघडला. नंतर मात्र तो घसरणीला लागला. नफा वसुलीचा फटका बसल्याने सेन्सेक्स २७,३२३.७४ अंकांपर्यंत घसरला होता. दुपारच्या सत्रात खरेदीचा जोर वाढल्यानंतर सेन्सेक्स भरभर वर चढला. एका क्षणी तो २७,६२0.६६ अंकांपर्यंत वर गेला होता. सत्र अखेरीस 0.४६ टक्क्यांची अथवा १२६.८९ अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,५८५.२७ अंकांवर बंद झाला.
आशियाई बाजारात आज संमिश्र चाल दिसून आली. आशियातील हाँगकाँग आणि सिंगापूर येथील बाजार 0.१९ टक्के ते 0.४५ टक्के वर चढले. चीन, दक्षिण कोरिया, तैवान येथील बाजार 0.१९ टक्के ते १.२७ टक्के घसरले. जपानचा बाजार आज बंद होता. युरोपातही संमिश्र कल दिसून आला. जर्मनी, ब्रिटन येथील बाजार 0.१0 टक्के ते 0.५१ टक्के घसरले. या उलट फ्रान्सचा सीएसी 0.४८ टक्क्यांनी वाढला. अमेरिकेतील शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. डिसेंबरमधील रोजगाराच्या आकड्यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेत संमिश्र कौल दिला.
बीएसईने उपलब्ध करून दिलेल्या हंगामी आकडेवारीनुसार, विदेशी संस्थांनी शुक्रवारी २९७.९९ कोटी रुपयांची समभाग विक्री केली.
शेअर बाजारात सलग तिस-या सत्रात तेजी
शेअर बाजारात सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२६.८९ अंकांनी वाढून १ आठवड्याच्या उंचीवर पोहोचला.
By admin | Updated: January 12, 2015 23:46 IST2015-01-12T23:46:51+5:302015-01-12T23:46:51+5:30
शेअर बाजारात सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२६.८९ अंकांनी वाढून १ आठवड्याच्या उंचीवर पोहोचला.
