मुंबई : गुंतवणूकदारांनी खरेदीचा मारा केल्याने बाजारात आजही तेजी राहिली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीच्या आर्थिक विकासदराने गुंतवणूकदारांत उत्साह दिसून आला. विशेषत: वाहन, धातू आणि बँकिंग शेअर्सना मोठी मागणी राहिली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 8,क्क्क् अंकावर पोहोचला. सेन्सेक्सही नवीन विक्रमी पातळी 26,867.55 अंकांवर बंद झाला.
3क् शेअर्सचा सेन्सेक्स 229.44 अंक वा क्.86 टक्क्यांच्या तेजीसह विक्रमी 26,867.55 अंकावर पोहोचला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स 26,9क्क्.3क् अंकार्पयत गेला होता. गेल्या सहा सत्रंत सेन्सेक्समध्ये जवळपास 324 अंकांनी वाढ नोंदली गेली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी प्रथमच 8,क्क्क् अंकापल्याड गेला. दिवसभरात तो 8,क्35 अंकार्पयत जाऊन अखेरीस 73.35 अंक वा क्.92 टक्क्यांच्या तेजीसह 8,क्22.7क् अंकावर बंद झाला. तत्पूर्वी, निफ्टीचा 7,954.35 अंक हा विक्रम होता. व्यापा:यांच्या मते, जीडीपीच्या आकडेवारीने भांडवल प्रवाहात तेजी राहिली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जूनच्या तिमाहीत आर्थिक विकासदर 5.7 टक्के राहिला. गेल्या तिमाहीसाठीची आकडेवारी गत शुक्रवारी जाहीर झाली. (प्रतिनिधी)
1,000 अंकांची वाढ
4तेजीचा सर्वाधिक लाभ हीरो मोटार्सला झाला. कंपनीचे शेअर्स 5.79 टक्क्यांनी वाढून 2,759.25 रुपयांवर पोहोचले. ऑगस्टमध्ये मारुती सुझुकीसह काही वाहन कंपन्यांच्या चांगल्या विक्रीचाही बाजारातील तेजीला लाभ झाला.
412 मे ते एक सप्टेंबर्पयत 78 सत्रंमध्ये निफ्टी 7क्क्क् पासून 8,क्क्क् अंकांवर पोहोचला.