Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजाराची उसळी

शेअर बाजाराची उसळी

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर घसरल्याने मुंबई शेअर बाजारात मंगळवारी घसरणीच्या सिलसिल्याला ब्रेक लागला आणि निर्देशांक 337.58 अंकांनी ङोपावून 25,368.9क् वर पोहोचला.

By admin | Updated: June 25, 2014 00:46 IST2014-06-25T00:46:14+5:302014-06-25T00:46:14+5:30

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर घसरल्याने मुंबई शेअर बाजारात मंगळवारी घसरणीच्या सिलसिल्याला ब्रेक लागला आणि निर्देशांक 337.58 अंकांनी ङोपावून 25,368.9क् वर पोहोचला.

Stock market rally | शेअर बाजाराची उसळी

शेअर बाजाराची उसळी

>मुंबई : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर घसरल्याने मुंबई शेअर बाजारात मंगळवारी घसरणीच्या सिलसिल्याला ब्रेक लागला आणि निर्देशांक 337.58 अंकांनी ङोपावून 25,368.9क् वर पोहोचला. पाच दिवसांत प्रथमच सेन्सेक्समध्ये वाढ नोंदली गेली.
तेल दरातील घसरणीमुळे बाजारातील महागाईची भीती कमी झाली. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि आयटीसी यासारख्या मोठय़ा कंपन्यांच्या शेअरची मागणी वाढल्याचा परिणाम बाजार धारणोवर झाला.
तेल शुद्धीकरण, बांधकाम, बँकिंग आणि सरकारी कंपन्यांच्या शेअर्सना लाभ झाला. मुंबई शेअर बाजाराच्या 3क् शेअरचा सेन्सेक्स सुरुवातीलाच ङोपावला. यानंतर दिवसभरात 25,414.69 अंकांवर पोहोचला आणि शेवटी 337.58 अंक किंवा 1.35 टक्क्यांनी वधारून 25,368.9क् अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सच्या 3क् शेअर्सपैकी 26 मध्ये फायदा झाला, तर चारमध्ये घसरण नोंदली गेली. गेल्या चार सत्रंत सेन्सेक्समध्ये 49क्अंकांची घसरण नोंदली गेली होती.
राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 86.85 अंकांच्या तेजीसह 7,58क्.2क् अंकांवर बंद झाला. दिवसभरात निफ्टीने उच्च पातळीवर 7,593.35 अंक आणि खालच्या पातळीवर 7,515.2क् अंकांला स्पर्श केला.
इराकमधील संकटाचा अद्याप तेल उत्पादनावर थेट परिणाम झाला नाही. यामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली.  (प्रतिनिधी)

Web Title: Stock market rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.