lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market: एकतर्फी वाढणाऱ्या शेअर्सच्या मोहात अडकाल तर असे फसाल...

Stock Market: एकतर्फी वाढणाऱ्या शेअर्सच्या मोहात अडकाल तर असे फसाल...

Stock Market: काही शेअर्स एकतर्फा वाढत असतात आणि बऱ्याच वेळा त्यास अप्पर सर्किट लागलेले असते. सामान्य गुंतवणूकदारांनी अशा शेअर्समधील गुंतवणूक टाळावी. आज इंग्रजी अक्षर ‘यू’ पासून सुरू होणाऱ्या दोन चांगल्या शेअर्सविषयी...

By पुष्कर कुलकर्णी | Published: January 30, 2023 06:17 AM2023-01-30T06:17:27+5:302023-01-30T06:18:11+5:30

Stock Market: काही शेअर्स एकतर्फा वाढत असतात आणि बऱ्याच वेळा त्यास अप्पर सर्किट लागलेले असते. सामान्य गुंतवणूकदारांनी अशा शेअर्समधील गुंतवणूक टाळावी. आज इंग्रजी अक्षर ‘यू’ पासून सुरू होणाऱ्या दोन चांगल्या शेअर्सविषयी...

Stock Market: If you get caught in the temptation of one-sided rising shares, you will be fooled... | Stock Market: एकतर्फी वाढणाऱ्या शेअर्सच्या मोहात अडकाल तर असे फसाल...

Stock Market: एकतर्फी वाढणाऱ्या शेअर्सच्या मोहात अडकाल तर असे फसाल...

- पुष्कर कुलकर्णी
शेअर बाजारात अप्पर आणि लोवर सर्किट लागल्याचे अनेकांनी अनेक वेळा पाहिले असेल. बऱ्याच वेळा फंडामेंटल कमकुवत असलेले, पेनी स्टॉक किंवा एखादी एकाद्या कंपनीविषयी चांगली किंवा वाईट मोठी बातमी आल्यास अप्पर किंवा लोवर सर्किट लागण्याची शक्यता अधिक असते. काही शेअर्स हे ऑपरेटर बेस असल्याने यात एकसारखा चढ-उतार पाहावयास मिळतो. काही शेअर्स एकतर्फा वाढत असतात आणि बऱ्याच वेळा त्यास अप्पर सर्किट लागलेले असते. सामान्य गुंतवणूकदारांनी अशा शेअर्समधील गुंतवणूक टाळावी. अतिरिक्त वाढलेल्या भावात रक्कम गुंतविल्यास त्यात अडकून राहण्याची शक्यता अधिक असते. कारण अशा शेअर्सला जसे अनेक वेळा अप्पर सर्किट लागते तसेच विक्रीचा मारा सुरू झाल्यास रोज लोवर सर्किटसुद्धा लागू शकते. अदानी समूहाचे शेअर्सही गेली दोन तीन वर्षे एकतर्फा वाढले होते. समूहाबाबत एका  बातमीने सर्व शेअर्स दोन दिवसांत खाली आले आणि काहींना लोवर सर्किटसुद्धा लागले. सामान्य गुंतवणूकदार अशा वेळेस वरच्या भावातील खरेदीदार असल्यास त्यात अडकून राहतो आणि पुन्हा भाव कधी वाढतील याची वाट पाहत बसतो. त्यामुळे अवाजवी वाढणाऱ्या शेअर्सचा मोह टाळणे उत्तमच. आज इंग्रजी अक्षर ‘यू’ पासून सुरू होणाऱ्या दोन चांगल्या शेअर्सविषयी...

अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACMCO) 
पायाभूत क्षेत्रातील सिमेंट उद्योगातील एक नामवंत कंपनी. सिमेंट आणि त्या अनुषंगिक उत्पादने बनविणे आणि विक्री हा प्रमुख व्यवसाय. 
फेस व्हॅल्यू : रुपये १०/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रु. ६७१५/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रु १ लाख ९४ हजार कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रु ७९४६/- आणि 
लो रु ५१५७ /-
बोनस शेअर्स : अद्याप नाही, शेअर स्प्लिट : अद्याप नाही
डिव्हिडंड : मागील डिव्हिडंड रक्कम रु ३८/- प्रती शेअर
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत तिपटीहून अधिक रिटर्न्स मिळाले.
भविष्यात संधी : उत्तम राहील. भारतात पायाभूत विकास कामे गतीने होत असल्याने सिमेंटला मागणी वाढती राहील.

यू पी एल लि. (UPL)
केमिकल क्षेत्रात मोडणारी शेतीशी निगडित पीक संरक्षण (फवारणी) उत्पादने, ऍग्रो औद्योगिक उत्पादन आणि स्पेशालिटी केमिकलमधील उत्पादने हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय आहे.
फेस व्हॅल्यू : २/- प्रति शेअर
सध्याचा भाव : रु. ७४५/- प्रति शेअर
मार्केट कॅप :  रु ५५ हजार ८०० कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रु ८४८/- आणि  
लो रु  ६०७/-
बोनस शेअर्स : दोन वेळा २००८ आणि २०१९ मध्ये
शेअर स्प्लिट : २००५ मध्ये एकदा स्प्लिट
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत  तब्बल १० पट रिटर्न्स मिळाले आहेत.
डिव्हिडंड : मागील डिव्हिडंड रुपये १०/- प्रती शेअर
भविष्यात संधी : उत्तम. भारत शेतीप्रधान देश असल्याने शेतीसाठी आवश्यक पीक संरक्षक उत्पादनांना मागणी चांगली राहील.

टीप : हे सदर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.
पुढील भागात ‘V’ या अक्षराने सुरू होणाऱ्या कंपन्यांविषयी...

Web Title: Stock Market: If you get caught in the temptation of one-sided rising shares, you will be fooled...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.