मुंबई : विदेशी बाजारातून आलेल्या संमिश्र संकेताच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी मंगळवारी घूमजाव करीत विक्रीचे धोरण स्वीकारल्याने सेन्सेक्स १४५ अंकांनी घसरून २५,५९०.६५ अंकांवर बाजार बंद झाला.
बीएसईतील सेन्सेक्सप्रमाणेच एनएसईतील निफ्टीचीही ७,८०० अंकाखाली घसरण झाली. धातू, एफएमसीजी आणि आॅटोमेकर्सच्या शेअर्सची मोठी घसरण झाली. एकूणच विक्रीच्या प्रभावाने सेन्सेक्स ०.५६ टक्क्यांनी म्हणजे १४५.२५ अंकांनी घसरून २५,५९०.६५ वर आला.
संसद दिवाळखोरीबाबतचे विधेयक संमत करण्याच्या आशेने सोमवारी सेन्सेक्स २१६.६८ अंकांनी वधारला होता. निफ्टीही ४८.३५ अंकांनी घसरून ७,७८६.१० अंकावर बंद झाला. गुरुवारी आणि शुक्रवारी बाजार बंद असल्याने गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याचा धोका पत्करला नाही.
जागतिक बाजारात आज निरुत्साही वातावरण होते. त्यामुळे प्रारंभापासून बाजारात सावध व्यवहार होत होते, त्यामुळे पुढे काय होणार याची कल्पना आली होती, असे हॅम सिक्युरिटीजचे संचालक गौरव जैन यांनी सांगितले.
आशियात अन्यत्र शांघाय कंपोझिट इंडेक्स ०.२६ टक्क्यांनी वधारला. युरोपातही प्रारंभी बाजारात चांगले वातावरण होते.
नफेखोरीमुळे शेअर बाजारात पडझड
विदेशी बाजारातून आलेल्या संमिश्र संकेताच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी मंगळवारी घूमजाव करीत विक्रीचे धोरण स्वीकारल्याने सेन्सेक्स १४५ अंकांनी घसरून २५,५९०.६५ अंकांवर बाजार बंद झाला.
By admin | Updated: December 23, 2015 02:18 IST2015-12-23T02:18:08+5:302015-12-23T02:18:08+5:30
विदेशी बाजारातून आलेल्या संमिश्र संकेताच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी मंगळवारी घूमजाव करीत विक्रीचे धोरण स्वीकारल्याने सेन्सेक्स १४५ अंकांनी घसरून २५,५९०.६५ अंकांवर बाजार बंद झाला.
