नवी दिल्ली : भाजीपाला आणि इंधनाच्या किमती उतरल्यामुळे ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये शून्यावर आला. हा साडेपाच वर्षांतील नीचांक असून, धोरणात्मक व्याजदरात कपात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर त्यामुळे दबाव वाढला आहे.
ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर आॅक्टोबरमध्ये १.७७ टक्के होता. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये मात्र तो ७.५२ टक्के होता.
केंद्र सरकारने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कांदा, खाद्यतेल, पेट्रोल आणि डिझेल या वस्तूंच्या किमती उतरल्यामुळे महागाईचा दर शून्यावर येऊ शकला. अन्नक्षेत्राचा निर्देशांक मे महिन्यापासून खाली येत होता. नोव्हेंबरमध्ये तो 0.६३ टक्क्यांवर आला. ही तीन वर्षांची नीचांकी पातळी आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील निर्देशांक ४.९१ टक्के झाला.
२00९ नंतरची ही सर्वांत नीचांकी पातळी आहे. ठोक महागाईचा निर्देशांक प्रथमच शून्यावर आला आहे. या आधी जुलै २00९ मध्ये तो उणे 0.३ टक्के झाला होता.
नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती ५६.२८ टक्के घसरल्या. आदल्या महिन्यात त्या ५९.७७ टक्के होत्या. भाजांच्या किमती २८.५७ टक्के घसरल्या. अंडी, मांस, मासे यांच्या किमतीत मात्र नोव्हेंबरमध्ये ४.३६ टक्के वाढ झाली आहे. बटाट्यांचा दर ३४.१0 टक्क्यांवर स्थिर राहिला. साखर, खाद्यतेले, पेये आणि सिमेंट यांच्या दरात २.0४ टक्क्यांची घट झाली.
किरकोळ महागाईच्या दरात नोव्हेंबरमध्ये ४.३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी आधीच जाहीर झाली आहे.
ठोक महागाई शून्यावर
भाजीपाला आणि इंधनाच्या किमती उतरल्यामुळे ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये शून्यावर आला.
By admin | Updated: December 16, 2014 05:03 IST2014-12-16T05:03:45+5:302014-12-16T05:03:45+5:30
भाजीपाला आणि इंधनाच्या किमती उतरल्यामुळे ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये शून्यावर आला.
