कोलकाता : भारताच्या पोलाद निर्यातीत डिसेंबरमध्ये ९२ टक्के वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर कालावधीत भारताने ४.९७७ दशलक्ष टन पोलाद निर्यात केले. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या ५७.८ टक्के ती जास्त आहे.
पोलाद मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१६-२०१७मध्ये एप्रिल ते डिसेंबर कालावधीत भारताने ५७.८ टक्के निर्यात जास्त करून ती
४.९७७ दशलक्ष टन केली.
डिसेंबर २०१६मध्ये ०.७४८ मेट्रिक टन (९२ टक्के) निर्यात जास्त करण्यात आली. डिसेंबर २०१५मध्ये जी निर्यात झाली त्यापेक्षा गेल्या महिन्यातील निर्यात ९२ टक्क्यांनी तर नोव्हेंबर २०१६च्या निर्यातीपेक्षा १३ टक्के जास्त होती, असे जॉइंट
प्लांट कमिटीच्या अहवालात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
- चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत उत्तम दर्जाच्या पोलादाची आयात २०१५-२०१६च्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील आयातीच्या तुलनेत ३७.४ % घटून ५.४९५ टनांवर आली.
- डिसेंबर २०१५च्या आयातीच्या तुलनेत डिसेंबर २०१६मधील आयात २३.२ टक्क्यांनी घटून ०.७६१ टन झाली. देशातील उत्तम दर्जाच्या पोलादाच्या वापरात २०१६-२०१७ वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर कालावधीत ३.३ टक्क्यांची वाढ होऊन ती ६१.५१७ टन झाली.
- डिसेंबर २०१६मध्ये पोलादाचा खप डिसेंबर २०१५मधील खपाच्या तुलनेत ५.२ टक्क्यांनी वाढून ७.२२५ टन झाला तर नोव्हेंबर २०१६मधील खपाच्या तुलनेत तो १७.१ टक्क्यांनी वाढला.
- २०१६-२०१७च्या एप्रिल ते डिसेंबर कालावधीत उत्तम दर्जाच्या विक्रीसाठीच्या पोलादाचे उत्पादन २०१५-२०१६च्या याच कालावधीतील उत्पादनापेक्षा १०.५ टक्के वाढून
73.771 टन झाले.
- विक्रीसाठी उत्तम दर्जाच्या पोलादाचे उत्पादन डिसेंबर २०१६मध्ये डिसेंबर २०१५च्या तुलनेत १२.४ टक्क्यांनी वाढून 8.416 टन झाले.
- नोव्हेंबर २०१६च्या तुलनेत ११ टक्के वाढले, असे अहवालात म्हटले आहे.
पोलाद निर्यातीत डिसेंबरमध्ये वाढ
भारताच्या पोलाद निर्यातीत डिसेंबरमध्ये ९२ टक्के वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर कालावधीत भारताने
By admin | Updated: January 10, 2017 00:41 IST2017-01-10T00:41:18+5:302017-01-10T00:41:18+5:30
भारताच्या पोलाद निर्यातीत डिसेंबरमध्ये ९२ टक्के वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर कालावधीत भारताने
