Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्थानक प्रबंधकाला महिलांची तंबी

स्थानक प्रबंधकाला महिलांची तंबी

दिवा स्थानकातील घटना : महिला बोगीतील आसने अपुरी

By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:56+5:302014-12-02T00:35:56+5:30

दिवा स्थानकातील घटना : महिला बोगीतील आसने अपुरी

Static remake of station manager | स्थानक प्रबंधकाला महिलांची तंबी

स्थानक प्रबंधकाला महिलांची तंबी

वा स्थानकातील घटना : महिला बोगीतील आसने अपुरी
...
डोंबिवली - दिवा रेल्वे स्थानकातून सुटणार्‍या दिवा-रोहा गाडीतील महिलांचा डबा बदलण्यात आला असून पूर्वीच्या डब्यापेक्षा कमी आसने असलेली बोगी दिल्याच्या निषेधार्थ महिलांनी रेल्वे प्रशासनाचा धिक्कार केला. आधी जादाची बोगी द्या, अन्यथा रेल रोकोला सामोरे जा, असा संतप्त सूर आळवून शेकडो महिला प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांनाच तंबी दिली.
या स्थानकातून सकाळी ९.०८ च्या सुमारास दिवा-रोहा मार्गावर गाडी सुटते. १५ दिवसांपूर्वी या गाडीतील महिलांचा डबा बदलण्यात आला. जेमतेम २० महिला प्रवासी बसू शकतील एवढीच आसने त्यात आहेत. महिला प्रवाशांच्या शेकडोंच्या संख्येसमोर ही आसनव्यवस्था तोकडी आहे. यासंदर्भात गेल्या आठवडाभरापासून महिलांनी स्थानक प्रबंधकांना तक्रारी देत तगादा लावला होता. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे महिलांनी सांगितले. परिणामी, सोमवारी त्यांनी थेट स्थानक प्रबंधकांना गाठून फैलावर घेतले. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा केली जाईल, असे सांगितले.
...
... अन्यथा रेल रोको
मुळातच दिवा-वसई या सेक्शनला सबर्बनचा दर्जा देऊन दोन वर्षे होत आली तरीही या ठिकाणी मूलभूत सुविधा नाहीत. दिवा-रोहा मार्गावरील प्रवाशांच्या समस्या सोडविण्यास रेल्वेला वेळच नाही. आता तर असलेल्या सुविधाही काढून घेतल्या जात आहेत. यात तातडीने सुधारणा करावी. अन्यथा, रेल रोको करण्यात येईल, असा इशारा लोहमार्ग पोलीस रेल्वे प्रवासी सुरक्षा समितीच्या सदस्य ॲड. सुप्रिया भगत यांनी दिला.
============
फोटो : -१ दिवा रोहा गाडी

Web Title: Static remake of station manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.