नाशिक : महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना आणि नाशिक जिल्हा खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २५ तारखेपासून नाशिकमध्ये कुमार गटाच्या मुले व मुलींची राज्य अजिंक्यपद स्पर्धा भरविण्यात येत आहे. जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले आणि सरचिटणीस मंदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मुला-मुलींचे प्रत्येकी २४ संघ सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे सुमारे ५० अधिकारी, पंच आदिही उपस्थित राहणार आहेत. सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांमध्ये होणारी ही स्पर्धा सायंकाळी प्रकाशझोतामध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी चार क्रीडांगणे सज्ज होत आहेत. प्रेक्षकांना स्पर्धेचा आस्वाद घेता यावा यासाठी मैदानालगतच्या हिरवळीवर आच्छादन टाकण्यात आले आहे. याशिवाय स्पर्धेचे गुण हा इलेक्ट्रॉनिक फलकाद्वारे दर्शविले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्पर्धेच्या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफीसह रोख स्वरूपाची सांघिक आणि वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार, दि. २५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता वनाधिपती विनायकराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक पितळे, उपमहापौर गुरुमित बग्गा आदि उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनचे सहचिटणीस उमेश आटवणे, कैलास ठाकरे, अविनाश खैरनार, आनंद खरे आदि उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)
फोटो २१पीएचएसपी०८
राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी तयार करण्यात येत असलेले मैदान.
नाशिकमध्ये होणार कुमार गटाची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा
नाशिक : महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना आणि नाशिक जिल्हा खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २५ तारखेपासून नाशिकमध्ये कुमार गटाच्या मुले व मुलींची राज्य अजिंक्यपद स्पर्धा भरविण्यात येत आहे. जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले आणि सरचिटणीस मंदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
By admin | Updated: September 23, 2014 00:12 IST2014-09-22T22:45:18+5:302014-09-23T00:12:34+5:30