अरुण बारसकर, सोलापूर
रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांसाठी नवनवे नियम घालणे सुरूच ठेवले आहे. कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) मध्ये आता ४ टक्के रक्कम ठेवावी लागणार असून, स्टॅट्यूट लिक्विड रिझर्व्ह (एसएलआर)ची २२.५ टक्के रक्कम शासकीय रोख्यातही गुंतवावी लागणार आहे. नव्या नियमाने राज्य बँकेतील ठेवी कमी होणार आहेत.
नागरी बँकांनी २५ टक्के ठेवीची रक्कम जिल्हा बँकेत ठेवण्याचे बंधन काढल्याने नागरी बँकांनी लागलीच जिल्हा बँकांतील ठेवी काढून घेतल्या़ यामुळे जिल्हा बँकांच्या ठेवीत मोठी घट झाली. त्यानंतरही अनेक नियम जिल्हा बँकांसाठी लागू केले. आता रिझर्व्ह बँकेचा नवा आदेश जिल्हा व राज्य बँकांसाठी अडचणीचा असला तरी राष्ट्रीयीकृत बँकांसाठी ‘अच्छे दिन’ येणारा आहे. जिल्हा बँकांना कलम १८ अन्वये सीआरआर (चालू खात्यावर) मध्ये ३ टक्के तर कलम २४ अन्वये एसएलआर (ठेव)मध्ये २५ टक्के रक्कम ठेवणे बंधनकारक होेते. ही रक्कम राज्य बँक तसेच शासकीय रोख्यात गुंतविण्याचे बंधन होते. आता चालू खात्यावर ३ऐवजी ४ टक्के रक्कम ठेवावी लागणार आहे. यामुळे जिल्हा बँकांचे नुकसान होणार आहे. ठेवीची रक्कम २५ टक्केऐवजी २२.५ टक्के करण्यात आली असून, आता ही ठेव राज्य बँक, शासकीय रोखे स्वरूपात तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गुंतविण्यास परवानगी दिली आहे. यामुळे जिल्हा बँकांच्या राज्य बँकांतील ठेवी आता राष्ट्रीयीकृत बँक तसेच शासकीय रोख्यासाठी वळणार आहेत. यामुळे राज्य बँकेचे मोठे नुकसान होणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशाने राज्य बँक अडचणीत
रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांसाठी नवनवे नियम घालणे सुरूच ठेवले आहे.
By admin | Updated: July 28, 2014 03:51 IST2014-07-28T03:51:33+5:302014-07-28T03:51:33+5:30
रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांसाठी नवनवे नियम घालणे सुरूच ठेवले आहे.
