इंदापूर : शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या वृत्ताने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत दि. २९ जुलैला ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन रस्त्यांच्या डागडुजीचे काम संबंधित विभागाने सुरू केले आहे.
शहरातील एसटी बस स्थानकासमोरचा पुणे-सोलापूर महामार्गाचा पट्टा, आगाराकडे जाणारा रस्ता, चिंदादेवी, कालठण गावांकडे जाणारे रस्ते व शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या सुमार दजार्मुळे तसेच पावसाच्या पाण्यामुळे दुरवस्था झाली आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. रस्त्यांची दुरुस्ती ही दर्जेदार पद्धतीने करण्यात यावी, ही नागरिकांची अपेक्षाही त्यामध्ये नमूद करण्यात आली होती. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. आगाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात मुरूम भरण्यात आला आहे. कालठण, चिंदादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यांची ही दुरुस्ती सुरू आहे.
रस्त्यांच्या कामाला सुरुवात
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या वृत्ताने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
By admin | Updated: August 3, 2016 01:01 IST2016-08-03T01:01:36+5:302016-08-03T01:01:36+5:30
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या वृत्ताने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
