शर्डी : येथील एकशे सहाव्या गुरूपौर्णिमा उत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या भाविकांनी साईनगरी उल्हासित झाली आहे़शुक्रवारी पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा व साईसच्चरित्र ग्रंथाच्या मिरवणुकीने उत्सवाचा प्रारंभ झाला़ साईसच्चरित्राचे पूजन करुन अखंड पारायणाला सुरूवात करण्यात आली़रात्री गावातून साईप्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली़ राज्याच्या विविध भागांतून तसेच परिसरातून पालख्या घेऊन आलेल्या पदयात्रींनी साईनगरी गजबजून गेली आहे़ साईभक्तांना पुरेसा लाडू प्रसाद उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने २७५ क्विंटल साखरेचे बुंदी लाडू तयार करण्यात आले आहेत़उत्सव काळात तीनही दिवस भाविकांच्या देणगीतून संस्थानच्या प्रसादालयात मोफत मिष्टान्न भोजन देण्यात येत आहे़( प्रतिनिधी)----------------स्वामीनगरी सज्ज अक्कलकोट : गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ मंदिर, अन्नछत्र, शिवपुरी गजानन महाराज, गुरू मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवपुरी गजानन महाराज धर्मात्मा संस्थेमार्फत गुरू मंदिर राम गल्लीत सकाळी आठ वाजता पालखी निघून समाधी मठ, श्री स्वामी समर्थ मंदिर येथे मिरवणुकीची सांगता होईल. पौर्णिमेदिवशी शिवपुरी केंद्र असणारे मुंबई, हैदराबाद, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पोलंड आदी ठिकाणांहून भाविक येत आहेत. मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल. ------------फोटो ११शिर्डी-फोटो
गुरूपौर्णिमा उत्सवास साईनगरीत प्रारंभ
शिर्डी : येथील एकशे सहाव्या गुरूपौर्णिमा उत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या भाविकांनी साईनगरी उल्हासित झाली आहे़
By admin | Updated: July 11, 2014 21:45 IST2014-07-11T21:45:25+5:302014-07-11T21:45:25+5:30
शिर्डी : येथील एकशे सहाव्या गुरूपौर्णिमा उत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या भाविकांनी साईनगरी उल्हासित झाली आहे़
