एसटी चालकाच्या प्रशिक्षणात त्रुटी
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:35+5:302015-01-29T23:17:35+5:30

एसटी चालकाच्या प्रशिक्षणात त्रुटी
>- एसटीतील सिम्युलेटर नादुरुस्त : कंपनीशी पत्रव्यवहारवसीम कुरैशीनागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात ड्रायव्हिंगला अधिक सक्षम बनविण्यासाठी बसविण्यात आलेल्या सिम्युलेटरच्या संगणकीय यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे तंतोतंत ड्रायव्हिंग शिकण्यात अडचणी येत आहे. यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कार्यालयाने कंपनीला पत्र पाठविले आहे. हे सिम्युलेटर विभागीय कार्यालयाच्या खोलीत बसविले आहे. यामध्ये चालकाचे कॅबिन आणि समोर स्क्रीन आहे. चालकाच्या सीटवर बसून गाडी सुरू करण्यापासून ते चालविण्यापर्यंतची सर्व प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येते. मुंबईतील कंपनीकडे या कामाचे कंत्राट आहे. ११ डिसेंबर २०१४ रोजी उद्घाटन झाले. करारानुसार तीन दिवस एसटीचे चालक आणि तीन दिवस बाहेरील व्यक्तींना ड्रायव्हिंग शिकविण्यात येते. एसटीच्या जागेवर ही यंत्रणा असतानाही एसटीच्या चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रति व्यक्ती १०० रूपये वसूल करण्यात येत आहे. कॅबिनमध्ये स्क्रीनची लांबी आणि रुंदी कमी आहे. प्रोजेक्टरसुद्धा अचूकतेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामध्ये बसविलेले संगणक थोड्याथोड्या वेळाने बंद पडते. हे सिम्युलेटर डिसेंबरमध्ये सुरू होते. याद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी होती. विभागीय कार्यालयाने एक महिन्याआधीच सिम्युलेटरच्या दुरुस्तीसाठी कंपनीला पत्र पाठविले आहे. पण कंपनी यासाठी इच्छुक दिसत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. फिटनेससाठी सेटअपची तयारीवाहनांच्या पासिंगसाठी कंपनी आधुनिक यंत्रणा बसविण्याच्या तयारीत आहे. केवळ दीड महिन्यातच सिम्युलेटरची यंत्रणा खराब झाली तर वाहनांच्या पासिंग उपकरणांचे काय हाल होतील, हा गंभीर सवाल आहे. अपघात होऊ नये म्हणून गाड्यांचे फिटनेस पाहिले जाते. कंपनी सिम्युलेटरसारखेच उपकरण बसवित असेलतर फायद्याऐवजी नुकसानच जास्त होईल. कंपनीने अलीकडेच मुंबईत रस्ता सुरक्षेवर आयोजन केले. बॉक्सत्रुटी दूर करण्यासाठी पत्रसिम्युलेटरची यंत्रणा योग्यरीत्या काम करीत नाही, हे खरे आहे. दुरुस्तीसाठी कंपनीला पत्र पाठविले आहे. पण कंपनीचे अभियंते अजूनही आलेले नाहीत. विजय घाटोळेे, विभागीय नियंत्रक, एसटी.