Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्पाइसजेटची खरेदी दोनच रुपयांत

स्पाइसजेटची खरेदी दोनच रुपयांत

स्पाइसजेट ही विमान कंपनी अजय सिंग यांनी कलानिधी मारन यांच्याकडून अवघ्या २ रुपयांमध्ये विकत घेतल्याचे दिल्ली उच्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 00:56 IST2017-07-08T00:56:08+5:302017-07-08T00:56:08+5:30

स्पाइसजेट ही विमान कंपनी अजय सिंग यांनी कलानिधी मारन यांच्याकडून अवघ्या २ रुपयांमध्ये विकत घेतल्याचे दिल्ली उच्च

SpiceJet purchases at two rupees | स्पाइसजेटची खरेदी दोनच रुपयांत

स्पाइसजेटची खरेदी दोनच रुपयांत

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : स्पाइसजेट ही विमान कंपनी अजय सिंग यांनी कलानिधी मारन यांच्याकडून अवघ्या २ रुपयांमध्ये विकत घेतल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात सिंग व मारन यांच्यात सुरू असलेल्या खटल्यामध्ये समोर आले आहे. जानेवारी २0१५मध्ये या दोघांमध्ये झालेल्या करारानुसार स्पाइसजेटमधील मारन यांचे ३५ कोटी शेअर किंवा ५८.५ टक्के भागीदारी सिंग यांनी मारन यांच्या काल एअरवेजकडून २ रुपयांना विकत घेतली.
हा कोणालाही जगातील सर्वांत स्वस्त सौदा वाटेल, कारण हा करार झाला त्या वेळी मारन यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य ७६५ कोटी रुपये होते. आजचा विचार केला तर स्पाइसजेटचा भाव वधारला असून, प्रति समभाग किंमत १२0 रुपये आहे, त्यामुळे अजय सिंगनी विकत घेतलेल्या त्या शेअर्सची आजची किंमत ४४00 कोटी रुपये झाली आहे.
परंतु हा सौदा झाला त्या आधीच्या आर्थिक वर्षात म्हणजे २0१४-१५मध्ये स्पाइसजेटला ६७८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्या वर्षी कंपनीचे एकूण नुकसान १३२९ कोटी रुपयांचे होते आणि कंपनीच्या डोक्यावर १४१८ कोटी रुपयांचे कर्ज होते. आर्थिक डबघाईमुळे बंद पडण्याच्या मार्गावर असलेली स्पाइसजेट सिंग यांनी तिच्या डोक्यावर असलेल्या सगळ्या कर्जासकट व देण्यांसकट विकत घेतली. त्यासाठी त्यांनी मारन यांना त्यांच्या हिश्शापोटी अवघे दोन रुपये दिले. स्पाइसजेट ताब्यात घेतल्यानंतर अजय सिंगनी तोट्यातील ही कंपनी नफ्यात आणली आणि त्यापुढे जाऊ न नव्या विमानांच्या खरेदीसाठी कंपनीने बोइंगला आॅर्डर दिली. त्याचा उल्लेख अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले असताना केला होता. या आॅर्डरमुळे अमेरिकन लोकांना रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले होते.
स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांनी ही कंपनी सिंग यांनी २ रुपयांत घेतली, असे म्हणणे चुकीचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. जर एखादी कंपनी तिच्या डोक्यावरील कर्जे व देणी यांच्यासकट विकत घेतली असेल तर कराराची किंमत केवळ २ रुपये न धरता ती देणी व कर्जे यांचाही त्यात समावेश केला पाहिजे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विकत घेतली अन् नफ्यात आणून दाखवले

बुडत असलेली स्पाइसजेट १७ डिसेंबर २0१४पासून आपण बंद करत
आहोत. त्यामुळे सगळी उड्डाणे रद्द करण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणारे पत्र मारन यांनी १६ डिसेंबर २0१४ रोजी केंद्र सरकारला लिहिले होते, मात्र, नंतर चक्रे फिरली आणि भाजपाचे खंदे समर्थक असलेल्या अजय सिंग यांनी स्पाइसजेट विकत घेतली आणि तिला नफ्यात आणून दाखवले.

Web Title: SpiceJet purchases at two rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.