नवी दिल्ली : स्पाइसजेट ही कंपनी बोइंगकडून २0५ विमाने खरेदी करणार असून त्यासाठी १,५0,000 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील मोठ्या सौद्यांपैकी एक सौदा म्हणून या व्यवहाराकडे पाहिले जात आहे.
स्पाइसजेटचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी या कराराची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सध्या कंपनीकडे नव्या पिढीचे बी७३७एस या जातीची ३२ विमाने आहेत. तसेच बंबार्डिअय क्यू४00एस या जातीची १७ विमाने आहेत. आणखी २0५ विमाने खरेदी करण्यासाठी कंपनीने आता बोइंगसोबत करार केला आहे.
या विमानांची एकूण किंमत १,५0,000 कोटी रुपये (२२ अब्ज डॉलर) आहे. नव्या विमानांच्या खरेदीसाठी लागणारे भांडवल विविध मार्गांनी उभे करण्यावर कंपनी विचार करीत आहे. नवी विमाने २0 टक्के कमी इंधनावर चालतील. त्यातून कंपनीला खर्च कपात करण्यात मदत होईल. कंपनीला एक जबाबदार आणि फायदेशीर कंपनीच्या स्वरूपात पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
अजय सिंग यांनी म्हटले की, कंपनीचे वही-खाते मजबूत आहे. पुढेही ते असेच राहील. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीला ५९ कोटींचा लाभ झाला. हा कंपनीच्या इतिहासातील सर्वोच्च तिमाही लाभ ठरला आहे. गेल्या वर्षी याच काळात कंपनीचा नफा २९ कोटी रुपये होता.
बोइंगचे उपाध्यक्ष रे कॉनर यांनी सांगितले की, स्पाईसजेटसोबत आम्ही दशकभरापासून गौरवास्पद भागीदारीत आहोत. २0५ विमानांसाठी आता नवा करार केला आहे. त्याचा आम्हाला सन्मानच वाटतो. (वाणिज्य प्रतिनिधी)
स्पाइसजेटचा बोइंगसोबत 205 विमानांसाठी करार
स्पाइसजेट ही कंपनी बोइंगकडून २0५ विमाने खरेदी करणार असून त्यासाठी १,५0,000 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.
By admin | Updated: January 14, 2017 01:31 IST2017-01-14T01:31:19+5:302017-01-14T01:31:19+5:30
स्पाइसजेट ही कंपनी बोइंगकडून २0५ विमाने खरेदी करणार असून त्यासाठी १,५0,000 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.
