राजरत्न सिरसाट, अकोला
विदर्भातील वीस लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक हातचे गेले असून, एकरी सरासरी दोन क्ंिवटल उत्पादन होत नसल्याचे पाहून शेतकरी गारद झाला आहे. पेरणीचा खर्च तर निघणारच नाही, सोयाबीन काढणीचा खर्चही पेलवत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.
यावर्षी दोन महिने उशिरा पाऊस आल्याने पेरण्यांना विलंब झाला. या प्रतिकुल परिस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी पश्चिम विदर्भात १५.५० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली.
आॅगस्ट व सप्टेबर महिन्यात सुरू वातीचे दोन दिवस १२४ व ९० मि.मी. पाऊस झाला; पंरतु त्यांनतर पावसाने दडी मारल्याने पिकांवर परिणाम झाला. अनेक किडींनी पिकाला ग्रासले, रसशोषण करणाऱ्या कीडी प्रामुख्याने कापसावर हल्ला करतात; परंतु यावर्षी प्रथमच या किडीने सोयाबीन पिकावर हल्ला केला. त्यामुळे अचानक पिके वाळली, पाने पिवळी पडली. परिपक्वतेच्या अवस्थेत आलेल्या या पिकाला पाण्याची नितांत गरज होती; परंतु यावर्षी पाऊस तर नव्हताच आणि परतीच्या पावसानेदेखील पाठ फिरविल्याने पिकाचे दाणे भरले नाहीत. त्यामुळे उत्पादन घटले असून, सोयाबीनचे हे पिक अपरिपक्वअवस्थेतच पूर्ण वाळले आहे. या परिस्थितीने शेतकरी गारद झाला असून, त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
यावर्षी मूग, उडीद हे पीक शेतकऱ्यांना घेता आले नाही, कापूस हे पीक शेतकऱ्यांनी कमी केले आहे. सर्व भिस्त सोयाबीन पिकावर होती; तथापि या पिकाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. सोयाबीन काढणीचा खर्च एकरी १६०० रूपये आणि मळणीचा खर्च प्रतिक्ंिवटल ३०० रूपये आहे. हमी भाव प्रति क्विंटल ३२०० रूपये असले तरी सध्या बाजारात २९०० रू पये प्रतिक्ंिवटल भाव आहेत. त्यामुळे सोयाबीन काढणेदेखील कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. ते नुकसान यापेक्षा जास्त आहे.
सोयाबीनने व-हा डातील शेतक-यांना केले गारद!
विदर्भातील वीस लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक हातचे गेले असून, एकरी सरासरी दोन क्ंिवटल उत्पादन होत नसल्याचे पाहून शेतकरी गारद झाला आहे.
By admin | Updated: October 16, 2014 05:52 IST2014-10-16T05:52:11+5:302014-10-16T05:52:11+5:30
विदर्भातील वीस लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक हातचे गेले असून, एकरी सरासरी दोन क्ंिवटल उत्पादन होत नसल्याचे पाहून शेतकरी गारद झाला आहे.
