Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्समध्ये किंचित घसरण

सेन्सेक्समध्ये किंचित घसरण

स्थानिक बाजारात गुरुवारी शेअर्सची मर्यादित खरेदी-विक्री झाली. मुंबई शेअर बाजारात निर्देशांक ११.५९ अंकांंनी घसरून २५,८३८ वर बंद झाला

By admin | Updated: December 25, 2015 01:22 IST2015-12-25T01:22:43+5:302015-12-25T01:22:43+5:30

स्थानिक बाजारात गुरुवारी शेअर्सची मर्यादित खरेदी-विक्री झाली. मुंबई शेअर बाजारात निर्देशांक ११.५९ अंकांंनी घसरून २५,८३८ वर बंद झाला

Somewhat lower in the Sensex | सेन्सेक्समध्ये किंचित घसरण

सेन्सेक्समध्ये किंचित घसरण

मुंबई : स्थानिक बाजारात गुरुवारी शेअर्सची मर्यादित खरेदी-विक्री झाली. मुंबई शेअर बाजारात निर्देशांक ११.५९ अंकांंनी घसरून २५,८३८ वर बंद झाला.
रिझर्व्ह बँकेच्या एका ताज्या अहवालात वसुली नसल्यामुळे फसून बसलेल्या कर्जाबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात ही किंचित घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.
शेअर बाजारात सुरुवातीला निर्देशांक २५,९२२ पर्यंत पोहोचला होता; पण गुंतवणूकदारांनी सतर्क राहण्याची भूमिका घेत शेअर्सची विक्री केली. त्यामुळे सेन्सेक्स घसरला आणि अखेर ११.५९ अंकांंनी घसरून तो २५,८३८ वर बंद झाला. सेन्सेक्स बुधवारी २५९ अंंकांनी मजबूत झाला होता, हे विशेष.

Web Title: Somewhat lower in the Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.