Lokmat Money > बिझनेस न्यूज > ्रजीवनात कधी-कधी साहस करावे लागते वल्लभवाणी

्रजीवनात कधी-कधी साहस करावे लागते वल्लभवाणी

सोलापूर :

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:02+5:302014-10-04T22:55:02+5:30

सोलापूर :

Sometimes there is a need for courage in life | ्रजीवनात कधी-कधी साहस करावे लागते वल्लभवाणी

्रजीवनात कधी-कधी साहस करावे लागते वल्लभवाणी

लापूर :
जीवन जगत असताना आपण आपल्या पद्धतीने म्हणजे न्यायपूर्वक जीवन जगले पाहिजे. परंतु आपल्यावर जर कोणी अन्याय करीत असेल तर त्यावेळी साहस हे करावेच लागते, असे पूज्य मुनीराज रवींद्र विजयजी म. सा. यांनी सांगितले.
जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या वतीने जोडभावी पेठेतील र्शी आदेश्वर मंदिरात आयोजित चातुर्मास प्रवचनमालेत ते बोलत होते. ते म्हणाले, आपण स्वत:हून कोणाच्या वाटेला जाऊ नये. कोणाचेही वाईट करू नये. अहिंसा परमो धर्म, दया, क्षमा, शांती आणि सर्वांविषयी प्रेमभाव यानुसार आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. असे करत असताना कोणी जरी आपल्या मार्गात काटे पेरत असेल किंवा आपल्याला त्रास देत असेल त्यावेळी त्या व्यक्तीला आधी प्रेमाने समजावून सांगावे. एक, दोन, तीन, चारवेळा सांगूनही काही उपयोग होत नसेल तर त्याला समजेल अशा पद्धतीने त्याचा प्रतिकार करावा.
वाईट गोष्टी, वाईट विचाराच्या लोकांचे र्मदन या विरोधात प्रसंगी म्हणजे साहसपूर्वक प्रतिकार करणे याला शास्त्रकारांनी पाप समजले नाही. परंतु आपण र्मयादा पाळणे गरजेचे असते. मुळात आपण धर्मकार्य, सद्गुरू सेवा, दया, परस्पराप्रती स्नेहपूर्वक व्यवहार या पद्धतीने आचरण करीत जीवन प्रवास करावा, असेही मुनीजींनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Sometimes there is a need for courage in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.