सलापूर- सोलापूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल़े 102 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते भीमानगर पुलापर्यंतचे काम आयएलअँण्डएफएस या कंपनीने केले आह़े सुमारे 835 कोटींचे हे काम आह़े याशिवाय सोलापूर ते संगारेड्डी या महामार्गाचे आणि सोलापूर ते येडशी या महामार्गाचेही भूमिपूजन करण्यात आल़े देहू-आळंदी-पंढरपूर या पालखी मार्गाचेही चौपदरीकरण तसेच सोलापूर-अक्कलकोट-गुलबर्गा या मार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा यावेळी केंद्रीय रस्ते व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली़ त्यामुळे सोलापूरसाठी हा दौरा निश्चित फलदायी ठरला आह़े सोलापूर ते विजापूर या रस्त्याचे चौपदरीकरणदेखील मंजूर असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरू आह़े पंतप्रधानांच्या दौर्यामुळे महामार्गाचे बहुतांश विषय मार्गी लागले आहेत़ चौकट़़़मोदींनी केले ट्विट़़़ या कार्यक्रमास जपानचे भारतातील राजदूत टेकेशी यागी, उच्चायुक्त क़ेई़ माशुदा, आयएलएफएस ग्रुपचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हरी शंकरन, व्यवस्थापकीय संचालक क़ेरामचंद, कार्यकारी संचालक मुकुंद सप्रे, उपाध्यक्ष क़ेआऱ खान, नेस्को (ईस्ट) या जपानी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोसे, संचालक मिकियो काक्यामाँ, ऑरिक्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिवोदा, भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक बी़क़े इखे, संजय कदम, सोलापूर रोड टोलवेज कंपनीचे तसेच पॉवर ग्रीडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत़े मोदींनी लगेच सहा वाजून 52 मिनिटांनी ट्विटरवर ट्विट करुन सोलापूर-पुणे महामार्ग व पॉवर ग्रीड लोकार्पण सोहळा सुंदर झाल्याचे म्हटले आह़े वन खात्याचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी या सोलापूर-पुणे महामार्गातील अनेक अडथळे दूर केल़े फोटो़़़़सोलापूर-पुणे महामार्गाचे काम आयएलअँण्डएफएस तसेच जपानच्या नेस्को ईस्ट या संयुक्त कंपनीने केले आह़े त्यामुळे या उद्घाटन सोहळ्यास जपानचे भारतातील राजदूत टेकेशी यागी, उच्चायुक्त क़ेई़ माशुदा उपस्थित होत़े यावेळी छायाचित्रात आयएलएफएस ग्रुपचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हरी शंकरन, व्यवस्थापकीय संचालक क़ेरामचंद, कार्यकारी संचालक मुकुंद सप्रे, उपाध्यक्ष क़ेआऱ खान, नेस्को (ईस्ट) या जपानी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोसे, संचालक मिकियो काक्यामाँ, ऑरिक्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिवोदा़
सोलापूर-पुणे महामार्गाचे उद्घाटन
सोलापूर-
By admin | Updated: August 16, 2014 23:07 IST2014-08-16T23:07:57+5:302014-08-16T23:07:57+5:30
सोलापूर-
