Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोलापूर जिल्?ात अवघ्या 12 महिला निवडणूक रिंगणात

सोलापूर जिल्?ात अवघ्या 12 महिला निवडणूक रिंगणात

सोलापूर जिल्?ात निवडणुकीच्या रिंगणात अवघ्या 12 महिला

By admin | Updated: October 4, 2014 22:54 IST2014-10-04T22:54:26+5:302014-10-04T22:54:26+5:30

सोलापूर जिल्?ात निवडणुकीच्या रिंगणात अवघ्या 12 महिला

In Solapur district, only 12 women contestants are in the fray | सोलापूर जिल्?ात अवघ्या 12 महिला निवडणूक रिंगणात

सोलापूर जिल्?ात अवघ्या 12 महिला निवडणूक रिंगणात

लापूर जिल्?ात निवडणुकीच्या रिंगणात अवघ्या 12 महिला
महिलांसाठी हात आखडता: राजकीय पक्षांकडून चौघींना उमेदवारी
सोलापूर : शिवाजी सुरवसे
‘मॅनपॉवर, मसलपॉवर आणि मनीपॉवर’ हेच ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असे सूत्र प्रत्येक राजकीय पक्षाने स्वीकारले आह़े त्यामुळेच उद्योजक, साखर सम्राट यांना विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी बहाल केली आह़े सोलापूर जिल्?ातील 11 विधानसभा मतदारसंघात 198 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभारले असून यामध्ये अवघ्या 12 महिला आहेत़ राष्ट्रवादीने 2 तर भाजप आणि काँग्रेसने अवघ्या एका महिलेस उमेदवारी दिली़ उर्वरित 7 महिला अपक्ष लढत आहेत़ महिला धोरण, महिला सबलीकरण आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारणार्‍यांनी महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतला आह़े
या 12 महिलांमध्ये सहा महिला एकट्या शहर मध्य मतदारसंघात आहेत़ याच मतदारसंघात आ़ प्रणिती शिंदे (काँग्रेस),मोहिनी पतकी(भाजप), विद्या लोलगे (राष्ट्रवादी) या तिघी उमेदवार राजकीय पक्षाच्या आहेत़ रश्मी बागल (राष्ट्रवादी, करमाळा) वगळता जिल्?ात राजकीय पक्षाने एकाही महिलेला उमेदवारी दिली नाही़ माढा, अक्कलकोट, सांगोला, माळशिरस या मतदारसंघात एकही महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही़
शिवसेना-भाजप युती तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा घटस्फोट झाल्यामुळे बहुतांश पक्षांना उमेदवार मिळाले नाहीत़ टन टन उड्या मारणार्‍यांना ध्येयधोरणे बाजूला ठेवून पक्षाच्या झुली चढविण्यात आल्या़ त्यामुळे उद्योजक, साखर सम्राटांना फटाफट उमेदवारी मिळाली; मात्र यामध्ये महिलांची उपेक्षा झाली़ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले त्यामुळे महिलांसाठी सर्वच पक्ष सढळ हाताने उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणतील असे चित्र होते मात्र महिलांना तोलून मोजून उमेदवारी दिली आह़े
जिल्?ाची लोकसंख्या 44 लाखांवर आह़े यातील मतदारांची संख्या 32 लाख 7 हजार 529 असून यामध्ये 15 लाख 14 हजार 104 महिला मतदार आहेत़


चौकट़़़
14 साखर सम्राट मैदानात
सोलापूर जिल्हा हा देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून प्रसिद्ध आह़े 32 कारखाने जिल्?ात असून निवडणुकीच्या रिंगणात 14 साखर सम्राट उतरले आहेत़ यामध्ये सुभाष देशमुख (भाजप), संजय शिंदे (स्वाभिमानी), रश्मी बागल (राष्ट्रवादी), शिवाजी सावंत (शिवसेना),कल्याणराव काळे (काँग्रेस), प्रशांत परिचारक (स्वाभिमानी), भारत भालके (काँग्रेस),दिलीप माने (काँग्रेस),सिद्रामप्पा पाटील (भाजप), सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस), दिलीप सोपल (राष्ट्रवादी), जयवंतराव जगताप (काँग्रेस), दादा साठे (भाजप पुरस्कृत अपक्ष).


इन्फो बॉक्स़़़
या 12 ‘रणरागिणी’ मैदानात़़़
आ़ प्रणिती शिंदे (काँग्रेस, शहर मध्य)
विद्या लोलगे (राष्ट्रवादी, शहर मध्य)
मोहिनी पतकी (भाजप, शहर मध्य)
नागमणी जक्कन (अपक्ष, शहर मध्य)
शोभा शिंदे (अपक्ष, शहर मध्य)
हिराबाई शिंदे (अपक्ष, शहर मध्य)
रश्मी बागल (राष्ट्रवादी, करमाळा)
सुवर्णा शिवपुरे (अपक्ष, बार्शी)
छाया केवळे (अपक्ष, मोहोळ)
रिना महिंद्रकर (अपक्ष, शहर उत्तर)
रेश्मा पटेल (अपक्ष, सोलापूर दक्षिण )
रत्नप्रभा पाटील (अपक्ष, पंढरपूर)

Web Title: In Solapur district, only 12 women contestants are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.