Lokmat Money > बिझनेस न्यूज > टिष्ट्वटर वापरकर्त्यांत भारत पोहोचणार तिसर्‍या क्रमांकावर

टिष्ट्वटर वापरकर्त्यांत भारत पोहोचणार तिसर्‍या क्रमांकावर

मायक्रो ब्लॉगिंग साईट टिष्ट्वटरचा वापरकर्त्यांत भारत वर्षअखेरीस जगात सितर्‍या स्थानावर पोहोचेल.

By admin | Updated: May 29, 2014 03:46 IST2014-05-29T03:46:50+5:302014-05-29T03:46:50+5:30

मायक्रो ब्लॉगिंग साईट टिष्ट्वटरचा वापरकर्त्यांत भारत वर्षअखेरीस जगात सितर्‍या स्थानावर पोहोचेल.

Snutter users reach India on the third spot | टिष्ट्वटर वापरकर्त्यांत भारत पोहोचणार तिसर्‍या क्रमांकावर

टिष्ट्वटर वापरकर्त्यांत भारत पोहोचणार तिसर्‍या क्रमांकावर

नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साईट टिष्ट्वटरचा वापरकर्त्यांत भारत वर्षअखेरीस जगात सितर्‍या स्थानावर पोहोचेल. ईमार्केटर या संशोधन संस्थेने दिलेल्या अहवालानुसार २०१४ च्या अखेरीस टिष्ट्वटर वापरणार्‍या भारतीयांची संख्या १.८१ कोटी होईल. ईमार्केटरने म्हटले आहे की, टिष्ट्वट करणार्‍या एकूण लोकसंख्येपैकी ३२.८ टक्के आशिया प्रशांत भागातील लोक असतील; तर २३.७ टक्के लोक उत्तर अमेरिकेतील असतील. टिष्ट्वटर वापरकर्त्यांच्या संख्येत उगवत्या बाजारपेठांचे योगदान मुख्य राहील. भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांचे योगदान त्यातल्या त्यात अधिक असेल. या वर्षाच्या अखेरीस टिष्ट्वट करणार्‍या लोकसंख्येत इंडोनेशिया १.५३ कोटी खातेदारांसह चौथ्या स्थानी असेल. टिष्ट्वटर वापरकर्त्यांच्या बाबतीत यंदा भारत आणि इंडोनेशिया ब्रिटनला मागे टाकतील. ईमार्केटरने म्हटले की, २०१८ सालापर्यंत उत्तर अमेरिकेच्या तुलनेत आशिया प्रशांत भागाचा हिस्सा तुलनेने दुप्पट होईल. तोपर्यंत चीन टिष्ट्वटरच्या नकाशावर आलाच तर ही हिस्सेदारी त्यापेक्षाही जास्त होईल. २०१४ सालात टिष्ट्वटर वापरणार्‍यांची एकूण संख्या वाढून २२.७५ कोटी होईल. गेल्या वर्षी ती १८.२९ कोटी होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Snutter users reach India on the third spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.