मुंबई : आलीशान आणि मोठ्या ब्रँडेड कंपन्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या व्यवसायाच्या कक्षा झपाट्याने विस्तारण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक लहान व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी स्पर्धेत टिकून राहणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. जे तंत्रज्ञान सध्या वापरले जात आहे, त्यापैकी बहुतांश घटक हे ना दुकानदार ना ग्राहक कुणालाही फारसे लाभदायी ठरताना दिसले नाहीत. परिणामी सामान्य दुकानदारांना तंत्रज्ञान उपलब्ध असूनही त्याचा फारसा लाभ होताना दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर छोटे व्यापारी आणि ग्राहक या दोघांसाठीही लाभदायी ठरू शकेल या अंगाने आता नवीन तंत्राविष्कार बाजारात येताना दिसत आहेत. विविध प्रकारच्या जीवनपयोगी वस्तूंच्या व गरजेच्या वस्तूंच्या बाजारात सध्या अनेक अॅप असली तरी व्यापारी आणि ग्राहक या दोघांच्या नेमक्या गरजा ओळखून त्यानुसार नेमकेपणाने काम करेल, अशा अॅपची कमतरता असल्याचे लक्षात घेत व छोट्या व्यापाऱ्यांनांही मोठ्या ब्रँडप्रमाणे विविध प्रकारच्या आॅफर्स देत ग्राहकांना आकृष्ट करता येईल अशा एका अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
मुंबईस्थित एका कंपनीने ‘नीयर यू’ या नावाने हे अॅप सादर केले असून हे छोटे व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून प्रामुख्याने हे अॅप काम करते. जीओ-टार्गेटींग तंत्राच्या आधारावर हे अॅप्लिकेशन चालते. याचे वैशिष्ट्य म्हणजे, या कंपनीने हजारो छोट्या व्यापाऱ्यांना या अॅपशी जोडले आहे. व्यापाऱ्यांना या अॅपच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत विविध प्रकारच्या आॅफर्स व सेल योजना पोहोचविता येतील. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे जीओ टार्गेटींग तंत्रावर हे अॅप चालत असल्याने ज्या विभागात ग्राहक असेल त्या विभागातील दुकाने त्या ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला आॅफर्स पोहोचवू शकतात. ज्यांंनी हे अॅप डाऊनलोड केले असेल अशा ग्राहकांना त्यांच्या फोनवर या आॅफर्सचे नोटिफिकेशन्स येत राहातील. नेमक्या पद्धथीने थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्याची सुविधा या वैशिष्ट्यपूर्ण सेवेमुळे नीयर यू हे अॅप व्यापारी आणि ग्राहक अशा दोघांसाठी उपयुक्त असल्याचे मत इम्प्रीसॅरिओ हॉस्पिटॅलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रियाझ अमलानी यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
सहा महिन्यांत सहा हजार दुकानेसरत्या सहा महिन्यात कंपनीने सहा हजार दुकानांशी करारबद्ध होत त्यांचे अस्तित्व अॅपच्या माध्यमातून इंटरनेटच्या विश्वात आणले आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना कपडे, लाईफ स्टाईल वस्तू, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आरोग्य आणि सौंदय प्रसाधने, टीव्ही व तत्सम मनोरंजनाची साधने, हॉटेल बुकिंग अशा विविध श्रेणीत व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या आॅफर्सचा लाभ घेता येईल.
‘अॅप’द्वारे छोट्या व्यापाऱ्यांनाही मोठ्या आॅफर्स
ब्रँडेड कंपन्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या व्यवसायाच्या कक्षा झपाट्याने विस्तारण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक लहान व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी स्पर्धेत टिकून राहणे दिवसेंदिवस कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2016 02:40 IST2016-06-03T02:40:24+5:302016-06-03T02:40:24+5:30
ब्रँडेड कंपन्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या व्यवसायाच्या कक्षा झपाट्याने विस्तारण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक लहान व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी स्पर्धेत टिकून राहणे दिवसेंदिवस कठीण
