Lokmat Money > बिझनेस न्यूज > घसरण सुरूच; सेन्सेक्स २७ हजारांखाली

घसरण सुरूच; सेन्सेक्स २७ हजारांखाली

गुरुवारी सलग तिस-या दिवशी घसरणीचा सिलसिला राहिला. सेन्सेक्स जवळपास ६२ अंकांच्या घसरणीसह २७,००० अंकांखाली आला

By admin | Updated: September 12, 2014 00:42 IST2014-09-12T00:42:30+5:302014-09-12T00:42:30+5:30

गुरुवारी सलग तिस-या दिवशी घसरणीचा सिलसिला राहिला. सेन्सेक्स जवळपास ६२ अंकांच्या घसरणीसह २७,००० अंकांखाली आला

Slow down; Sensex 27 Thousand Downs | घसरण सुरूच; सेन्सेक्स २७ हजारांखाली

घसरण सुरूच; सेन्सेक्स २७ हजारांखाली

मुंबई : मुंबई शेअर बाजारात गुरुवारी सलग तिस-या दिवशी घसरणीचा सिलसिला राहिला. सेन्सेक्स जवळपास ६२ अंकांच्या घसरणीसह २७,००० अंकांखाली आला. जवळपास दोन आठवड्यातली सेन्सेक्सची २६,९९५.८७ अंक ही नीचांकी पातळी आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सिरिया व इराकमधील दहशतवादी नेस्तनाबूत करण्याचा इरादा जाहीर केला आहे. सिरिया व इराक हे प्रमुख तेल उत्पादक देश म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह प्रमुख व्याजदरात वाढ करण्याच्या चर्चेने बाजारात जोर धरला आहे. परिणामी बाजारात घसरण नोंदली गेली आहे.
सनफार्मा, ओएनजीसी व कोल इंडियासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सची मोठी विक्री झाल्यानेही सेन्सेक्समध्ये घट दिसून आली.
मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स दिवसभरात २७,१५०.७८ अंक या उच्चांकी पातळीवर गेला होता. मात्र, दिवसअखेरीस नफेखोरी झाल्याने ६१.५४ अंक वा ०.२३ टक्क्यांच्या घसरणीसह २६,९९५.८७ अंकांवर बंद झाला. १ सप्टेंबरनंतर सेन्सेक्सची ही नीचांकी पातळी आहे. त्यादिवशी सेन्सेक्स २६,८६७.५५ अंकांवर बंद झाला होता. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स ३२४ अंकांनी घसरला.
याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही गुरुवारी ८.४० अंक वा ०.१० टक्क्यांच्या घसरणीसह ८,०८५.७० अंकांवर बंद झाला. गेल्या २ सप्टेंबरनंतर निफ्टीची ही नीचांकी पातळी आहे. त्यादिवशी निफ्टी ८,०८३.०५ अंकांवर बंद झाला होता. दिवसभरात निफ्टी ८,०५० ते ८,१२७.९५ अंकांदरम्यान राहिला.
ब्रोकर्सनी सांगितले की, अमेरिकेत रोजगारविषयक आकडेवारी जाहीर होण्यापुर्वी आशियाई व युरोपीय बाजारात कमजोर कल दिसून आला. यामुळे स्थानिक बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Slow down; Sensex 27 Thousand Downs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.