Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्राप्तिकर खात्याची आता ‘सिंगल विन्डो’ सेवा

प्राप्तिकर खात्याची आता ‘सिंगल विन्डो’ सेवा

पॅन कार्डासाठी अर्ज करण्यापासून ते प्राप्तिकराचे विवरण भरण्यापर्यंत सर्व काही सुविधा 'सिंगल विन्डो' पद्धतीने

By admin | Updated: September 22, 2014 23:11 IST2014-09-22T23:11:46+5:302014-09-22T23:11:46+5:30

पॅन कार्डासाठी अर्ज करण्यापासून ते प्राप्तिकराचे विवरण भरण्यापर्यंत सर्व काही सुविधा 'सिंगल विन्डो' पद्धतीने

The 'single window' service for the income tax department is now available | प्राप्तिकर खात्याची आता ‘सिंगल विन्डो’ सेवा

प्राप्तिकर खात्याची आता ‘सिंगल विन्डो’ सेवा

नवी दिल्ली : पॅन कार्डासाठी अर्ज करण्यापासून ते प्राप्तिकराचे विवरण भरण्यापर्यंत सर्व काही सुविधा 'सिंगल विन्डो' पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारने आज, सोमवारी प्राप्तिकर विभागाची नवी वेबसाईट सादर केली.
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याहस्ते या वेबसाईटचे अनावरण होणार होते; परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. प्राप्तिकर खाते व त्याच्याशी निगडित करदात्यांची विविध कामे यांच्याकरिता सध्या दोन ते तीन वेबसाईट कार्यरत आहेत; परंतु यात सुसूत्रता राखण्यासाठी आणि करदात्यांच्या सर्व कामांची पूर्तता एकाच वेबसाईटद्वारे करण्यासाठी एकाच छताखाली सर्व सुविधा या वेबसाईटच्या माध्यमातून सरकारने सादर केल्या आहेत. तसेच, एकूणच विवरण भरण्याच्या कालावधीत या वेबसाईटवर येणारी ट्रॅफिक लक्षात घेता वेबसाईट क्रॅश होऊ नये, याकरिता त्याच्या क्षमतेतही वाढ करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The 'single window' service for the income tax department is now available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.