प्रलेखक संघाने केला शिक्षकांचा गौरवपंढरपूर - येथील पत्रलेखक संघातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी माया सांगोलकर, सुनील विश्वासे, हणमंत भोसले, ज्ञानेश्वर चव्हाण, धनंजय साबळे, तानाजी शिंदे, नारायण घेरडे यांचा सत्कार केला. यावेळी नानासाहेब रत्नपारखी, लवटे, अवधूत म्हमाणे, अशोक कोर्टीकर, राजू मुलाणी, धनंजय नाईकनवरे, शोभा माळवे आदी उपस्थित होते.मोहसीन विद्यालयात शिक्षक दिन साजरापंढरपूर - इसबावी-पंढरपूर येथील मोहसीन विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आर. एल. मुजावर, डी. व्ही. मलपे, एल. बी. घोडके, गावित, प्रकाश नवले, स्वप्नाली घाडगे, सोमनाथ मलपे उपस्थित होते.र्शीराम पॉलिटेक्निकमध्ये कार्यशाळाखुडूस - पानीव येथील र्शीराम पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट डेव्हलपमेंट गाईडन्सचे प्रा. मुकुंदराज होले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. जी. आर. सहस्रबुद्धे, प्राचार्य प्रमोद खंदारे, महेश दिरंगे आदी उपस्थित होते.नातेपुते येथे जोरदार पावसाची हजेरीनातेपुते - नातेपुते परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पावसाने पुन्हा शेतकरी आनंदित झाला. शेतातील पीक वाया गेलेच किमान बांधावर, मोकळ्या रानात, टेकडीवर गवत उगवून पशुधन तरी वाचेल, अशी त्यांना आशा लागली आहे.विझोरी जलशुद्धीकरण केंद्रास भेटखुडूस - पानीव येथील र्शीराम स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विझोरी येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली. जलशुद्धीकरण केंद्राचे निरीक्षक जाधव, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी प्राचार्य प्रमोद खंदारे, जलशुद्धीकरण केंद्राचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सुगाव खुर्द येथे पाण्यासाठी बोअर खुलेनेमतवाडी - जिल्?ात दुष्काळ तीव्र झाला आहे. पाण्याचे सर्व स्रोत कोरडे पडले आहेत. यामुळे जनावरांच्या चार्याचा व पाण्याचा प्रo्न गंभीर झाला आहे. या परिस्थितीत बबन देवकर यांनी गावकर्यांसाठी बोअर खुला करून एक आदर्श निर्माण केला आहे.पिलीव परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊसपिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाने परिसरातील शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परतीचा मोठा पाऊस पडल्यास शेतकरी ज्वारीची पेरणी करू शकेल; अन्यथा जनावरांना कडबाही मिळू शकणार नाही.
सिंगल प?ा
पत्रलेखक संघाने केला शिक्षकांचा गौरव
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:42+5:302015-09-07T23:27:42+5:30
पत्रलेखक संघाने केला शिक्षकांचा गौरव
