ज़प़चतुर्थर्शेणी कर्मचार्यांचे आंदोलनसोलापूर: महाराष्ट्र राज्य चतुर्थर्शेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रकारच्या 24 मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आह़े 1 सप्टेंबरपासून आमदार उपोषण, एक दिवस लाक्षणिक संप, निदर्शने, सकाळच्या सत्रात दोन तासांचे कामबंद आंदोलन , बेमुदत संप करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष र्शीशैल देशमुख, सूर्यकांत गायकवाड आणि संजय चव्हाण यांनी कळविले आह़े शांताई अनाथार्शमास भेटसोलापूर: शांताई अनाथार्शमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला खरात (माने) यांनी फ्रीज भेट दिला आह़े यावेळी विजयमाला माने, उज्ज्वला बनसोडे, अनिता जाधव, अबोली मच्छा, मनीषा गायकवाड, शोभा गायकवाड, साईनाथ गायकवाड आदी उपस्थित होत़ेगणेशमूर्ती काढण्याचे काम सुरूसोलापूर: सिध्देश्वर तलावातील गणेश विसर्जन कुंडामध्ये विसजिर्त केलेल्या गणेशमूर्ती काढण्याचे काम आता सुरू झाले आह़े महापालिकेने ठेकेदार नेमून हे काम दिले आह़े गेल्या पाच दिवसांपासून हे काम सुरू आह़े गेल्यावर्षीच या मूर्ती काढल्या असत्या तर वर्षभर दुर्गंधी टाळता आली असती़र्शफसाफल्य योजनेचा लाभ द्या सोलापूर: महापालिकेतील 20 वर्षांची प्रदीर्घ सेवा विचारात घेऊन शासनाने जाहीर केल्याप्रमाणे महापालिकेतील 71 सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यासाठीची कागदपत्रे व बॉण्डपत्रे नगरअभियंता विभागाने स्वीकारुन केले आह़े बर्याच दिवसापासून हा प्रश्न असून तो तातडीने सोडविण्याची मागणी मनपा कामगार संघटनेच्या वतीने केली आह़े दुभाजकाचे काम पूर्ण सोलापूर: महापालिकेच्या वतीने चार पुतळ्याजवळ दुभाजक करण्यात आला आह़े या दुभाजकाचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये आता लवकरच झाडी लावण्यात येणार आह़े जिल्हाधिकार्यांनी याबाबत महापालिकेला पत्र लिहून या ठिकाणी दुभाजक करण्याच्या सूचना केल्या होत्या़ त्यानुसार हे काम मनपाने पूर्ण केले आह़े रस्ता खोदलासोलापूर:महापालिकेने रंगभवन ते विजापूर वेस ते माणिक चौक हा रस्ता नगरोत्थान योजनेतून केला असून तो ठिकठिकाणी खोदण्यात आला आह़े रडत खडत हे काम सुरू आह़े कधी दुभाजक उभारणे, कधी फेवरब्लॉक बसविणे आदी कामे केली जाते आहेत़ वर्षभरापासून हे काम सुरू आह़ेविजापूर वेसकडे जाताना अनेक ठिकाणी हा रस्ता ड्रेनेज चेंबरसाठी खोदला आह़े दुसरे प्रवेशद्वार सुरूसोलापूर: सिध्देश्वर तलावाशेजारी मार्केट यार्डजवळ असलेले प्रवेशद्वार सतत बंद असत़े र्शावण महिना सुरू झाल्यामुळे हे प्रवेशद्वार उघडण्यात आले आह़े सध्या तरी येथे साफसफाई केली जात असून मंदिर समितीने सुरक्षा रक्षकाची इथे व्यवस्था केली आह़े घाणी पाणी, कचरा यामुळे इथे सतत दुर्गंधी असत़ेबाळे पुलाचे काम सुरूसोलापूर: सोलापूर-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये बाळे उड्डाण पुलाचे काम बर्याच दिवसापासून या ना त्या कारणाने रखडले होत़े गेल्या तीन दिवसापासून हे काम सुरू करण्यात आले आह़े जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी मुरुमाचा प्रश्न सोडविल्यामुळे हे काम सुरू झाले आह़े चौपाटीवर बेशिस्तसोलापूर: गेल्या आठ दिवसांपूर्वी विजेचा धक्का बसून पार्क चौपाटीवर एका कामगाराचा मृत्यू झाला तरीही इथे शिस्त आली नाही़ बेशिस्त, स्वच्छतेचा अभाव, विविध ठिकाणी अतिक्रमणे केल्यामुळे महापालिकेने या ठिकाणी लक्ष देऊन शिस्तबध्द पार्क चौपाटी करणे गरजेचे आह़ेझाडे लावण्याची गरजसोलापूर: महापालिकेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केलेल्या रस्त्यावरील फुटपाथामध्ये अनेक ठिकाणी रिकामे खड्डे आहेत त्यामध्ये झाडी लावण्याची आवश्यकता आह़े सध्या नगरोत्थान योजनेतील कामे सुरू असून फुटपाथावर झाडे लावण्यासाठी जागाच ठेवली नाही़ बाळीवेसमध्ये खड्डेच खड्डेसोलापूर: मधला मारुती ते बाळीवेस ते शिवाजी चौक हा रस्ता प्रचंड खराब झाला आह़े ड्रेनेज लाईन तसेच पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदण्यात आला, तो बुजविला नाही़ त्यामुळे दुतर्फा खड्डे आहेत, मध्यभागी देखील खूप मोठे खड्डे पडले आहेत़ मनपाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आह़े
सिंगल बातम्या शिवाजी़़़़़
जि़प़चतुर्थर्शेणी कर्मचार्यांचे आंदोलन
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30
जि़प़चतुर्थर्शेणी कर्मचार्यांचे आंदोलन
