नवी दिल्ली : मे महिन्याच्या अखेरपर्यंत वित्तमंत्रालय सोपा आयकर रिटर्न फॉर्म जारी करण्याची शक्यता आहे. निष्क्रिय असलेली बँक खाती आणि किमान शिल्लक नसलेली खात्यांची फॉर्ममध्ये नोंद करण्याचे बंधनही काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.
आयकर विभागाने अलीकडेच नवा आयकर रिटर्न फॉर्म जारी केला होता. त्यात विदेश प्रवास तसेच इतर अनेक बाबींची माहिती देण्याचे बंधन घालण्यात आले होते. यामुळे हा फॉर्म आणखी क्लिष्ट झाला होता. उद्योग जगत आणि खासदारांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला होता. त्यानंतर सरकारने लक्ष घालून हा फॉर्म रद्द केला होता. आता अधिक सोपा फॉर्म जारी करण्यात येणार आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
या फॉर्ममध्ये कटकटीची माहिती भरण्याची गरज राहणार नाही.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संसदेचे सत्र संपल्यानंतर अधिकाऱ्यांची एक अंतर्गत बैठक होईल. निष्क्रिय बँक खात्यांची माहिती आयकर फॉर्ममध्ये भरणे बंधनकारक करावे की नाही, या मुद्यावर आम्ही विचार करीत आहोत. अनेक खात्यांवर फारच छोटी रक्कम असते. आयटीआर-१ आणि आयटीआर-२ या फॉर्मच्या सुलभीकरणाचा अंतिम निर्णय याच महिन्याच्या अखेरपर्यंत वित्तमंत्री अरुण जेटली घेणार आहेत.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अत्यंत सोपा आयकर फॉर्म उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या मुद्यावर कर विभागाने औद्योगिक संघटनांशी विचारविनिमयही केला आहे.
महिनाअखेरपर्यंत येणार सोपा आयकर रिटर्न फॉर्म
मे महिन्याच्या अखेरपर्यंत वित्तमंत्रालय सोपा आयकर रिटर्न फॉर्म जारी करण्याची शक्यता आहे.
By admin | Updated: May 10, 2015 22:51 IST2015-05-10T22:51:27+5:302015-05-10T22:51:27+5:30
मे महिन्याच्या अखेरपर्यंत वित्तमंत्रालय सोपा आयकर रिटर्न फॉर्म जारी करण्याची शक्यता आहे.
