नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार्या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानक व गोदाकाठच्या घाटांची पाहणी करून त्याला जोडणार्या रस्त्यांची माहिती घेतली.
बुधवारी नाशिक दौर्यावर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी सिंहस्थ कुंभमेळा कामांचा आढावा घेतल्यानंतर दुसर्याच दिवशी विभागीय आयुक्तांनी कुंभमेळ्यासाठी व त्यातल्या त्यात शाहीस्नानासाठी येणार्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन गर्दीचे नियोजन व नियंत्रण करण्याच्या दृष्टीने पोलीस, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, वीज व एस. टी. महामंडळाच्या अधिकार्यांसोबत संयुक्त पाहणी केली. त्यात प्रामुख्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकात सुरू असलेल्या चौथ्या व नवीन प्लॅटफॉर्मच्या कामाची पाहणी केली. या नवीन कामामुळे रेल्वेस्थानकावर दोन तिकीट खिडक्या व प्रवेशद्वार उभे राहणार असल्याने जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र मार्ग अस्तित्वात येतील जेणेकरून रेल्वेस्थानकात होणारी गर्दी नियंत्रित करता येणे शक्य होणार आहे. रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण व सिंहस्थांतर्गत केल्या जाणार्या कामांची माहिती आयुक्तांनी घेतली. त्यानंतर टाकळी येथे भाविकांच्या स्नानाची काय सोय होऊ शकते याची माहिती जाणून घेतानाच किती भाविक स्नान करू शकतील, त्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकते याची पाहणी करण्यात आली. टाकळी येथील घाटावर येऊन मिळणारे रस्ते व त्याद्वारे होणार्या वाहतुकीचा अंदाज घेण्यात आला. यानंतर पाटबंधारे खात्याकडून केल्या जाणार्या टाळकुटेश्वर पूल ते कन्नमवार पुलानजीकच्या घाट विकासाचाही आढावा घेण्यात आला. द्वारकेकडून (तिगरानिया मार्ग) किती वाहतूक होऊ शकते व किती भाविक घाटावर स्नान करू शकतात त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
रेल्वेस्थानक, घाटांची संयुक्त पाहणी सिंहस्थ कुंभमेळा : गर्दी नियंत्रणावर उपाययोजना
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार्या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानक व गोदाकाठच्या घाटांची पाहणी करून त्याला जोडणार्या रस्त्यांची माहिती घेतली.
By admin | Updated: September 19, 2014 00:29 IST2014-09-18T22:52:54+5:302014-09-19T00:29:28+5:30