नवी दिल्ली : ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निधी संघटनेने नवीन वर्षात एक पाऊल पुढे टाकण्याचा इरादा स्पष्ट करीत शेअर बाजारात प्रवेश केला आहे. तथापि, ईपीएफच्या सदस्यांना व्याजदर वाढीचा लाभही नव्या वर्षात मिळू शकतो, असे संकेत आहेत. सध्या हे व्याजदर ८.७५ वर स्थिर आहेत.
आपल्या निधीमधून अधिक रिटर्न मिळविण्याच्या उद्देशाने ईपीएफने हे पाऊल उचलले आहे. आपल्या सहा लाख कोटी रुपयांच्या निधीपैकी काही रक्कम या योजनेंतर्गत गुंतविली जाऊ शकते. त्याचाच एक भाग म्हणून ईपीएफने एक्स्चेंज ट्रेडेड फंडसमध्ये गुंतवणूक करणे सुरू केले
आहे.
ट्रेड युनियनने या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, त्यानंतरही ईपीएफओ आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला आहे.
या वर्षी ईपीएफने काही नवीन सेवा सुरू केल्या आहेत. यात प्रामुख्याने आॅनलाईन हेल्पडेस्कची सुविधा आहे. या माध्यमातून खातेदार आपल्या जुन्या व नव्या खात्यांचा तपशील बघू शकतात. पीएफच्या खात्यात सलग ३६ महिने रक्कम न भरल्यास ते खाते बंद होते आणि पीएफ या खात्यात व्याज टाकणे बंद करते. अर्थात, खातेदार ही रक्कम काढून घेऊ शकतात अथवा त्याचे स्थानांतरण करू शकतात.
ईपीएफच्या व्याजदर वाढीचे संकेत
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निधी संघटनेने नवीन वर्षात एक पाऊल पुढे टाकण्याचा इरादा स्पष्ट करीत शेअर बाजारात प्रवेश केला आहे.
By admin | Updated: December 24, 2015 00:19 IST2015-12-24T00:19:16+5:302015-12-24T00:19:16+5:30
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निधी संघटनेने नवीन वर्षात एक पाऊल पुढे टाकण्याचा इरादा स्पष्ट करीत शेअर बाजारात प्रवेश केला आहे.
