Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदीत अल्प प्रमाणात तेजी

सोने-चांदीत अल्प प्रमाणात तेजी

विदेशी बाजारातील बळकटी व लग्नसराईमुळे दागिन्यांच्या वाढलेल्या विक्रीने येथील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ४० रुपयांनी वाढून दहा ग्रॅमला २७,१२० रुपये झाला.

By admin | Updated: April 13, 2015 23:34 IST2015-04-13T23:34:32+5:302015-04-13T23:34:32+5:30

विदेशी बाजारातील बळकटी व लग्नसराईमुळे दागिन्यांच्या वाढलेल्या विक्रीने येथील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ४० रुपयांनी वाढून दहा ग्रॅमला २७,१२० रुपये झाला.

Short-term increase in gold and silver | सोने-चांदीत अल्प प्रमाणात तेजी

सोने-चांदीत अल्प प्रमाणात तेजी

नवी दिल्ली : विदेशी बाजारातील बळकटी व लग्नसराईमुळे दागिन्यांच्या वाढलेल्या विक्रीने येथील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ४० रुपयांनी वाढून दहा ग्रॅमला २७,१२० रुपये झाला. याच बरोबर उद्योग आणि नाणे तयार करणाऱ्यांकडून मागणी आल्यामुळे चांदीचा भावही किलोमागे १०० रुपयांनी वाढला.
बाजार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील बाजाराचा कल स्पष्ट करणाऱ्या सिंगापूरमध्ये सोन्याच्या भावात ०.२ टक्के वाढीमुळे ते १,२०९.६५ डॉलर प्रति औंस व चांदीच्या किमतीत ०.५ टक्क्यांची वाढ होऊन ती १६.५४ डॉलर प्रति औंस झाली.
चांदीच्या भावातही किलोमागे १०० रुपयांनी वाढ होऊन ३७,००० आणि साप्ताहिक डिलिव्हरी १० रुपयांनी वाढून ३६,७०० रुपये किलो झाली. चांदीचे नाणे प्रति शेकड्यामागे तब्बल एक हजाराने वाढून खरेदीचा भाव ५६,००० रुपये व विक्रीचा भाव ५७,००० रुपये प्रति शेकडा असा झाला होता.

४राजधानीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव अनुक्रमे ४० -४० रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,१२० व २६,९७० रुपये दहा ग्रॅम झाला होता. गेल्या दोन सत्रांत सोन्याच्या भावात ३३० रुपयांची तेजी आली होती. मर्यादित विक्रीमुळे गिन्नीचा भाव ८ ग्रॅ्रमला २३,७०० रुपये स्थिर राहिला.

Web Title: Short-term increase in gold and silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.