मुंबई : अत्यंत अस्थिर वातावरण राहिलेल्या शेअर बाजारांत सोमवारी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0९ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३१ अंकांनी घसरला. जून-जुलै या तिमाहीतील जीडीपीचा डेटा जाहीर होण्यापूर्वी बाजारात विक्रीचा प्रचंड मारा झाला. त्यामुळे बाजारांत घसरण झाली.
आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. चीनचे निर्देशांक 0.८२ टक्के घसरले. सप्टेंबरमध्ये आपण व्याजदर वाढ करू शकतो, असे संकेत अमेरिकी फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. त्याचा फटका जगभरातील बाजारांना बसला आहे. भारतात रुपयाच्या घसरणीने शेअर बाजारातील घसरणीला हातभार लावला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २६,४६९.४२ अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वाढून २६,५0४.७३ अंकांपर्यंत गेला. त्यानंतर मात्र विक्रीचा मारा सुरू झाला आणि घसरण सुरू झाली. एका क्षणी बाजार २६,२१५.१६ अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्राच्या अखेरीस १0९.२९ अंकांच्या अथवा 0.४१ टक्क्यांच्या घसरणीसह सेन्सेक्स २६,२८३.0९ अंकांवर बंद झाला. गेल्या दोन सत्रात सेन्सेक्स ६७७.७२ अंकांनी वाढला होता.
सेन्सेक्सप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही घसरून ८000 अंकांच्या खाली आला. ३0.६५ अंकांची अथवा 0.३८ टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ७९३१.३0 अंकांवर बंद झाला.
सोमवारी आॅगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस होता. या महिन्यात सेन्सेक्स तब्बल १,८३१.४७ अंकांनी अथवा ६.६१ टक्क्यांनी घसरला आहे. एनएसई निफ्टीही ५६१.५५ अंकांनी अथवा ६.५८ टक्क्यांनी घसरला आहे.
भेलचा समभाग सर्वाधिक ३.४५ टक्क्यांनी घसरला. त्या पाठोपाठ भारती एअरटेलचा समभाग २.१४ टक्क्यांनी घसरला. घसरणीचा फटका बसलेल्या अन्य बड्या कंपन्यांत हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, आरआयएल, ओएनजीसी, टाटा स्टील, इन्फोसिस, मारुती सुझुकी, एसबीआय, एचडीएफसी, एमअँडएम आणि एलअँडटी यांचा समावेश आहे.
घसरणीचा कल असताना औषधी कंपन्यांचे समभाग वाढले. सिप्ला, डॉ. रेड्डीज, सन फार्मा यांचे समभाग ३.५५ टक्क्यांपर्यंत वर चढले. मुंबई शेअर बाजारातील ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक १.५४ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल रिअल्टी, इन्फ्रा, कॅपिटल गुडस्, आॅटो, कंझ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी आणि बँकिंग या क्षेत्रांचे निर्देशांक घसरले.
विक्रीच्या माऱ्याने शेअर बाजारात मोठी घसरण
अत्यंत अस्थिर वातावरण राहिलेल्या शेअर बाजारांत सोमवारी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0९ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा
By admin | Updated: August 31, 2015 22:36 IST2015-08-31T22:36:50+5:302015-08-31T22:36:50+5:30
अत्यंत अस्थिर वातावरण राहिलेल्या शेअर बाजारांत सोमवारी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0९ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा
