Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारातील घसरणीला ‘ब्रेक’

शेअर बाजारातील घसरणीला ‘ब्रेक’

किरकोळ महागाईची आकडेवारी कमी होऊन ७.३१ टक्के या ३० महिन्यांच्या खालच्या पातळीवर आल्याने व्याजदर आधारित बँकिंग, बांधकाम आणि भांडवली वस्तू कंपन्यांच्या शेअरमध्ये मंगळवारी तेजी नोंदली गेली

By admin | Updated: July 16, 2014 01:53 IST2014-07-16T01:53:53+5:302014-07-16T01:53:53+5:30

किरकोळ महागाईची आकडेवारी कमी होऊन ७.३१ टक्के या ३० महिन्यांच्या खालच्या पातळीवर आल्याने व्याजदर आधारित बँकिंग, बांधकाम आणि भांडवली वस्तू कंपन्यांच्या शेअरमध्ये मंगळवारी तेजी नोंदली गेली

Shares of 'Break' | शेअर बाजारातील घसरणीला ‘ब्रेक’

शेअर बाजारातील घसरणीला ‘ब्रेक’

मुंबई : किरकोळ महागाईची आकडेवारी कमी होऊन ७.३१ टक्के या ३० महिन्यांच्या खालच्या पातळीवर आल्याने व्याजदर आधारित बँकिंग, बांधकाम आणि भांडवली वस्तू कंपन्यांच्या शेअरमध्ये मंगळवारी तेजी नोंदली गेली. यामुळे मुंबई शेअर बाजारात सलग पाच दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ‘ब्रेक’ लागला. सेन्सेक्स २२२ अंकांनी उंचावला.
मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स २२१.६७ अंक किंवा ०.८९ टक्क्यांनी उंचावून २५,२२८.६५ अंकांवर पोहोचला. यात गेल्या पाच सत्रांत १,१०० अंकांची घट झाली होती.
स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्येही किरकोळ गुंतवणूकदारांद्वारे झालेल्या चांगल्या मागणीमुळे २ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदली गेली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ७२.५० अंक किंवा ०.९७ टक्क्यांनी उंचावून पुन्हा ७,५०० च्या पातळीवर झेपावून तो ७,५२६.६५ अंकांवर स्थिरावला.
महागाई कमी झाल्याने बाजाराच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ब्रोकर्सनी सांगितले जून महिन्याची किरकोळ महागाई ७.३१ टक्क्यांवर आली आहे. ही जानेवारी २०१२ नंतरची सर्वांत खालची पातळी आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)










 

Web Title: Shares of 'Break'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.