Lokmat Money > बिझनेस न्यूज > शारदा घोटाळा : आरबीआय अधिकारी अडकणार

शारदा घोटाळा : आरबीआय अधिकारी अडकणार

कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआय लवकरच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार आहे.

By admin | Updated: November 3, 2014 03:17 IST2014-11-03T03:17:20+5:302014-11-03T03:17:20+5:30

कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआय लवकरच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार आहे.

Sharda scam: RBI officials will get stuck | शारदा घोटाळा : आरबीआय अधिकारी अडकणार

शारदा घोटाळा : आरबीआय अधिकारी अडकणार

नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआय लवकरच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार आहे. काही आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात सीबीआयला या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण हवे आहे, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
शारदा समूह बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून कार्यरत नव्हती. त्यामुळे या कंपनीच्या कामकाजाचे रिझर्व्ह बँकेने नियमन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु तरीही रिझर्व्ह बँकेशी काही व्यवहार झाल्याने त्याबाबत स्पष्टीकरण करण्याची गरज आहे; परंतु या अधिकाऱ्यांच्या चौकशीकडे केवळ गुन्ह्याच्या संदर्भातून पाहू नये. काही दस्तऐवज आणि काही परिस्थितीबाबतचे स्पष्टीकरण पाहिजे असल्याने ही चौकशी केली जाणार आहे, असे या सूत्रांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Sharda scam: RBI officials will get stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.